गंभीर आजार यादीत कोविड विमा कवच समावेश करण्याची मागासवर्गीस शिक्षक संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:45+5:302021-04-28T04:23:45+5:30
वडवळ : कोविड-१९ आजाराने मृत्यू होणाऱ्या प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांना ५० लाखांचा विमा कवच, सानुग्रह साह्य लागू करावे ...
वडवळ : कोविड-१९ आजाराने मृत्यू होणाऱ्या प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांना ५० लाखांचा विमा कवच, सानुग्रह साह्य लागू करावे व या आजाराचा समावेश गंभीर आजार या यादीमध्ये करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी दिली.
सध्या सर्वत्र कोरोना विरुद्ध लढण्यासाठी खेड्यापाड्यात, शहरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कोविड सर्वेक्षण करीत फिरत आहेत. अशात काही ठिकाणी शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर काही आजारी पडून उपचार घेत आहेत. आजारी पडलेल्या शिक्षकांचा आजारावरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर होण्यासाठी या आजाराचा समावेश गंभीर आजाराच्या यादीत होणे आवश्यक आहे.
यावेळी संघटनेचे सहसचिव शशीकांत खुडे, सरचिटणीस राजेंद्र म्हसदे, कार्याध्यक्ष चंदन लांडगे, राज्य नेते मधुकर कांबळे, स्वप्निल चाबुकस्वार, तुकाराम जावीर, राजेंद्र भांमरे, राम निकंबे, संतोष काटे, चंद्रकांत गोसावी ,सल्लागार शाम शिंगे, यशवंत कांबळे उपस्थित होते. (वा. प्र.)