प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन

By दिपक दुपारगुडे | Published: April 30, 2023 05:50 PM2023-04-30T17:50:05+5:302023-04-30T17:50:51+5:30

या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.

Balasaheb Thackeray apala dawakhana in every taluka On Monday, the Chief Minister eknath shinde will inaugurate online | प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन

प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन

googlenewsNext

सोलापूर : नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यात ८  तालुक्यांमध्ये सोमवारी, महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.

   राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वित्त आयोगातून जिल्ह्यातील शहरी भागातील जनतेला सुलभ आणि परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार जिल्ह्यात आठ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ सोनिया बागडे  यांनी दिली आहे 

या मिळणार सुविधा-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये बाह्यरुग्ण सेवा (दुपारी २ ते रात्री १० वा.), मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकल्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सुविधा मिळणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, याशिवाय एक्स-रे ,सोनोग्राफी इत्यादी चाचणी करता पॅनलवरील  डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात सबंधित वैदकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञाच्या सेवा देखील उपलब्ध होतील.मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा,योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ सोनिया बागडे व जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ धनंजय पाटील यांनी दिली आहे

जिल्ह्यातील याठिकाणी सुरू होणार आपला दवाखाना 
- अक्कलकोट शहर अक्कलकोट नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ अक्कलकोट
-  बार्शी शहर बार्शी नगरपरिषद लोढा प्लॉट बार्शी
-  माढा शहर कुर्डूवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र कुर्डवाडी.
-  माळशिरस माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार माळशिरस
-  मंगळवेढा शहर मंगळवेढा नगरपरिषद योग भवन  मंगळवेढा
-  मोहोळ मोहोळ नगरपरिषद दत्त मंगल हॉल मोहोळ
-  पंढरपूर शहर पंढरपूर नगरपरिषद क्लॉक रूम सांगोला नाका पंढरपूर.
-  सांगोला सांगोला नगरपरिषद जि प शाळा चांदोलीवाडी सांगोला.
 

 

Web Title: Balasaheb Thackeray apala dawakhana in every taluka On Monday, the Chief Minister eknath shinde will inaugurate online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.