वर्षभरासाठी चारा नियोजनात बळीराजा व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:47+5:302021-04-16T04:21:47+5:30
अवकाळीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची चारा साठवणुकीसाठी धांदल उडाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. चांगला पाऊस पडल्याने परिसरात झाल्याने परिसरात ...
अवकाळीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची चारा साठवणुकीसाठी धांदल उडाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
चांगला पाऊस पडल्याने परिसरात झाल्याने परिसरात ज्वारीबरोबर चाऱ्याचे डेपो लावून चारा साठवण्याची जुनी पद्धत वैरणीची गंज लावण्याचे काम जोमात सुरू झाले आहे. याशिवाय नवीन पद्धतीने मूरघास चारा बनविणे या प्रक्रियेसाठी शेतकरी अग्रेसर दिसत आहे.
सध्या अवकाळीची धास्ती लागल्यामुळे चाऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी घाईगडबडीने शेतकरी चारा साठवण योग्य ठिकाणी करण्यात व्यस्त दिसत आहे.
चाऱ्याचे दर भडकले
अलिकडील काळात ज्वारी उत्पादनाच्या बाबतीत तालुका मागे पडत आहे. सहाजिकच ज्वारीचा कडबा कमी उत्पादित होत आहे. यामुळे पावसाळ्यात जनावरांसाठी योग्य चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शेतकरी सध्या इतरत्र भागातून कडबा खरेदी करीत आहे. शिवाय मक्यापासून मुरघास तयार करण्यासाठी ओल्या चाऱ्याकडेही शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. दुग्ध व्यवसाय जोमाने सुरू असल्यामुळे चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांची रस्सीखेच दिसत आहे. १५ ते २५ रुपयांना पेंढी व १२०० ते १५०० रुपये प्रति गुंठा दराने चारा खरेदी सुरू आहे. सध्या अवकाळी पावसाने भीती घातल्यामुळे चारा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे, असे जळभावीचे शेतकरी भानुदास चोरमले यांनी सांगितले.