शिवार पिकवण्यासाठी बळीराजाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:47+5:302021-06-06T04:16:47+5:30
तालुक्यातील पूर्व भागातील वागदरी, शिरवळवाडी, शिरवळ, सांगवी, सदलापूर, सलगर, बणजगोळ, ममनाबाद, चिक्केहळळी, हत्तीकणबस, निमगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस ...
तालुक्यातील पूर्व भागातील वागदरी, शिरवळवाडी, शिरवळ, सांगवी, सदलापूर, सलगर, बणजगोळ, ममनाबाद, चिक्केहळळी, हत्तीकणबस, निमगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात एकीकडे आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शेतातील अरण फुटून, एकमेकांची एकमेकांच्या शेतात माती वाहून गेली आहे. पेरणीपूर्वी खर्चिक बाब समोर आल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
तालुक्यात सर्रास भागात रोज पाऊस येत आहे. उन्हाळ्यात मशागत केलेल्या शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. मशागतकामी शेतकरी पळापळी करीत असले तरी, पाऊस पाठ सोडेनासा झाला आहे. यामुळे वेळेवर मशागत होऊन खरिपाची पेरणी वेळेवर होणे कठीण होत आहे.
---
पेरणीची तयारी
अक्कलकोट शहराजवळील केशर ओढा भरून वाहत आहे. ममनाबद, बणजगोळ या भागातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. शेतकरी जमिनीची मशागत करणे, पेरणीची तयारी करणे, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ करीत आहेत.
----
०४ अक्कलकोट शेती
ओळ :
तालुक्यातील ममनाबाद शिवारात झालेल्या पावसाने बांध फुटून एकमेकांच्या शेतात वाहून गेलेले दिसत आहेत.