सोलापूर बाजार समितीसाठी कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करणार ,  उत्तर तालुका राष्टÑवादी काँग्रेसची बैठकीत बळीराम साठे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:36 PM2018-02-06T14:36:04+5:302018-02-06T14:37:56+5:30

बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी कोणासोबत तरी आघाडी करायचीच आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल

Baliram Sathe's statement in the meeting of the North Taluka Nation-Wadi Congress, considering the opinion of the workers for the Solapur Bazar Samiti. | सोलापूर बाजार समितीसाठी कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करणार ,  उत्तर तालुका राष्टÑवादी काँग्रेसची बैठकीत बळीराम साठे यांची माहिती

सोलापूर बाजार समितीसाठी कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करणार ,  उत्तर तालुका राष्टÑवादी काँग्रेसची बैठकीत बळीराम साठे यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकजिल्हा परिषद निवडणुकीवेळी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच व त्यांच्या आग्रहामुळेच भाजपासोबत आघाडी केली : बळीराम साठेउत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा कल काँग्रेस विरोधात..


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी कोणासोबत तरी आघाडी करायचीच आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी सांगितले.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक दबडे, वडाळ्याचे उपसरपंच जितेंद्र साठे, राष्टÑवादी युवकचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नवगिरे,  पं.स. सदस्य जितेंद्र शिलवंत, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, दिलीप माने, सुनील भोसले, दत्तात्रय घोडके, रामभाऊ माने, मल्लिनाघ तंबाके, श्रीकांत मार्तंडे, भुजंग लंबे, प्रकाश चोरेकर, दिलीप क्षीरसागर, भारत बोंगे, बाबासाहेब पाटील, अभिमन्यू पांढरे, मोहन लांबतुरे, लक्ष्मण जाधव, एकनाथ शिंदे, सुदाम शिंदे, लहू घोडके, प्रताप पाटील, धनंजय माने, तानाजी पवार, धनाजी शिरसट, नागेश पवार, जितेंद्र भोसले, मनोज साठे, बाबासाहेब पांढरे, काशिनाथ कांबळे, रमेश सुतार व नंदकुमार गरड आदीसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच व त्यांच्या आग्रहामुळेच भाजपासोबत आघाडी केली होती. बाजार समितीच्या निवडणुकीतही आपणाशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल असे साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.राष्टÑवादीची ताकद ही सर्वसामान्य कार्यकर्ता हीच असून बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मत व पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्याशी चर्चा करुनच कोणाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल असे बळीराम साठे यांनी सांगितले.
----------------------------
कार्यकर्त्यांचा कल काँग्रेस विरोधात..
आतापर्यंत काँग्रेसने जवळ घेऊन पाठीत खंजीर खुपसला असून बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेससोबत आघाडी करण्यास अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध केला. तालुक्यातील सहापैकी तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत असेही मत काहींनी व्यक्त केले.

Web Title: Baliram Sathe's statement in the meeting of the North Taluka Nation-Wadi Congress, considering the opinion of the workers for the Solapur Bazar Samiti.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.