गुंतागुंतीच्या ओपनहार्ट शस्त्रक्रियेला 'अश्विनी ग्रामीण'मध्ये बलूनचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:04+5:302021-02-26T04:32:04+5:30
काळगी येथील श्रीदेवी अक्कलकोट या विवाहितेच्या हृदयाला रक्त पुरवठा करणारी डाव्या बाजूची महत्त्वाची झडप (मायट्रेल व्हॉलव्ह) इन्फेक्शनमुळे लहानपणी आकुंचित ...
काळगी येथील श्रीदेवी अक्कलकोट या विवाहितेच्या हृदयाला रक्त पुरवठा करणारी डाव्या बाजूची महत्त्वाची झडप (मायट्रेल व्हॉलव्ह) इन्फेक्शनमुळे लहानपणी आकुंचित झाली होती. रक्ताभिसरण क्रियेत मोठा अडथळा होता. त्यात हृदयाजवळ रक्ताची गाठ होती. कुंभारी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असल्याने या महिलेवर बलून मायट्रल व्हाल्वोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. ट्रस्टी मेहुल पटेल यांनी ग्रामीण रुग्णांसाठी सर्व सोयी-सुविधा पुरविल्याने अशा अवघड शस्त्रक्रिया पार पाडणे शक्य असल्याचे डॉ. राहुल कारीमुंगी यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांनी अभिनंदन केले. या शस्त्रक्रियेसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवनगौडा, डॉ. शिरीष पिचके यांचे सहकार्य लाभले.
नामांकित हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरीसाठी किमान पाच लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, अश्विनी ग्रामीण रुग्णालयात केवळ अर्ध्या खर्चात शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. राहुल कारीमुंगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी लीलया शस्त्रक्रिया करून आम्हाला दिलासा दिला, असे रुग्ण महिलेचे पती मल्लिकार्जुन अक्कलकोट यांनी सांगितले.
फोटो ओळी
अश्विनी ग्रामीण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णासोबत डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. बसवन गौडा, डॉ शिरीष पिचके, आदी.