प्रदूषणाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शेतकºयाने दिले जिल्हाधिकाºयांना चक्क केळीचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:43 PM2020-02-10T16:43:43+5:302020-02-10T16:45:00+5:30
शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात; शेतकºयांच्या प्रश्नाची जिल्हाधिकाºयांनी तातडीने दखल
सोलापूर : बीबीदारफळ येथील साखर कारखान्याच्या काजळीमुळे केळीचे पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार शिरापूरच्या शेतकºयांनी केली़ प्रदूषणाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी बजरंग पाटील या शेतकºयाने चक्क केळीचे झाड जिल्हाधिकाºयांचा समोर आणले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे लोकमंगल साखर कारखाना आहे़ या कारखान्यांतून येणाºया धुराच्या काजळीमुळे शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात आली आह़े. विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी भोसले यांना जागेवरून तपासणी करण्याची सूचना केली़ यावेळी संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.