वैरागमधील बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:12+5:302020-12-09T04:17:12+5:30
वैराग : केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याविरोधात भारत बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी म्हणून नवीन ...
वैराग : केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याविरोधात भारत बंदला शहरात प्रतिसाद मिळाला.
केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी म्हणून नवीन कृषी कायदा निर्माण केला आहे. मात्र विरोधकांनी सादर केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. असा आरोप करत तो तात्काळ रद्द करावा म्हणून शेतकरी संघटनानी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला वैराग येथील कोणत्याही राजकीय पक्षाने आवाहन केले नव्हते. येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत पाठिंबा दिला. दरम्यान, येथील बाजार समिती, कृषिसेवा केंद्र, भाजी मार्केट, कापड बाजार, धान्य, किराणा, भुसार, सराफ कट्टा या सर्व बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला गेला. तसेच एसटी बसेस स्थानकातच थांबवून ठेवल्या होत्या.
----
फोटो : ०८ वैराग
वैराग येथील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पाळलेला बंद.