तिकडे हरियाणात बंडूचा मृत्यू झाला, इकडे सुपनवर वस्तीत चुलीच पेटल्या नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:23+5:302021-09-23T04:25:23+5:30
कुस्तीचे धडे घेणारा गुणी व माळकरी असलेल्या बंडूच्या निधनाने साऱ्या वस्तीत हळहळ व्यक्त होत आहे. येथील श्री कमला भवानी ...
कुस्तीचे धडे घेणारा गुणी व माळकरी असलेल्या बंडूच्या निधनाने साऱ्या वस्तीत हळहळ व्यक्त होत आहे. येथील श्री कमला भवानी स्पोर्टस क्लबच्या वतीने सहभागी हरियाणा मधील महक (जि. रोहतक) येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने बंडू त्यात सहभागी झाला होता. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बंडू दत्तात्रय वाघमोडे (वय २१) याचे ता. १९ रोजी धावण्याच्या स्पर्धेदरम्यान आकस्मित हदयविकाराचा धक्का बसून निधन झाले. ही घटना समजल्यानंतर प्रशिक्षक दिनेश जाधव, तसेच बंडूचे बंधू नामदेव वाघमोडे व अशोक वाघमोडे हे हरियाणाला गेले आहेत. शवचिकित्सा व सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतर बंडूचे पार्थिव एअर ॲब्युलन्सने पुण्यापर्यंत आणण्यात येणार होते. पण एअर ॲब्युलन्स चुकल्याने बाय रोडने पार्थिव घेऊन करमाळ्याकडे निघाले आहेत.
........
बंडूला पोलीस खात्यात जाण्याची होती इच्छा
वाघमोडे परिवार मूळचा निलज येथील रहिवाशी आहे. ते अलिकडे सुपनवर वस्ती येथे वास्तव्यास आहेत. दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. नामदेव हा जेसीबी ऑपरेटर असून बंडू हा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षाला आहे. येथील दिनेश जाधव यांच्या श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबमध्ये बंडू वाघमोडे सराव करत होता. बंडू यास पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती व तो त्याची तयारी करत होता.
..............
फोटो २२ करमाळा बंडू