वांगी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:52 AM2019-01-08T10:52:57+5:302019-01-08T10:54:35+5:30
सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी येथे एका शेतात शौचाला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अज्ञात आरोपीने तिच्या ...
सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी येथे एका शेतात शौचाला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अज्ञात आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. हा खळबळजनक प्रकार सोमवारी दुपारी ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला.
अल्पवयीन मुलगी वांगी येथे एका शेतात बाहिणीकडे रहात होती. सकाळी ११ वाजता ती शौचालयालस गेली मात्र बराच वेळ परत आली नाही. हा प्रकार तिच्या भावजीच्या लक्ष्यात आला. त्याने पत्नीस बोलावुन तिचा शोध घेण्यास सुरूवात केली, मात्र ती कोठेही आढळून आली नाही.
काही वेळेनंतर घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतातच ती विवस्त्र व जखमी अवस्थेत आढळून आली. बहीण व महिलांनी मोठ्याने रडण्यास सुरूवात केली. तिच्या जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यात मोठा दगड घालण्यात आला होता. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.
हा प्रकार तत्काळ शेताच्या मालकाला मोबाईलवरून सांगण्यात आला. शेताचा मालक हा घटनास्थळी आला त्याने जीप मागवून मुलीस उपचारासाठी कुटे येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे उपचार करून मुलीस सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.
गावात खळबळ...
च्अत्याचार झालेल्या मुलीची आई लहानपणीच निधन पावली आहे. तिला दोन बहिणी व वडील आहेत. दोघींची लग्ने झाले आहेत़ वडील ऊसतोड कामगार असून तो मराठवाड्यात काम करतो. मुलगी कधी वडिलासोबत तर कधी बहिणीसोबत राहते. दीड महिन्यापूर्वी ती वडिलाकडून बहिणीकडे आली होती. बहीण आणि भावजी कामाला गेल्यानंतर ती त्यांच्या घरातील कामे करीत होती. मुलांचा सांभाळ करीत होती. आरोपी कोण होता, त्याने कसा अत्याचार केला.