बँक वसुली कर्मचाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून २९ हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:23+5:302021-08-22T04:26:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करमाळा : बचत गटाला दिलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून रोख ...

The bank recovered Rs 29,000 by throwing chutney in the eyes of the recovery employee | बँक वसुली कर्मचाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून २९ हजार लुटले

बँक वसुली कर्मचाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून २९ हजार लुटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

करमाळा : बचत गटाला दिलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून रोख २४ हजार रुपये आणि मोबाइलसह २९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार शुक्रवारी पोफळज येथे घडला. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी खंडू मनोहर ढोले (वय २९, रा. येवलेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. कृष्णाजी नगर करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

खंडू ढोले हे शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून पोफळज येथील कांबळे वस्ती येथे दुधे यांच्याकडे बचत गटाचे पैसे गोळा करण्याकरिता आले होते. दुधे बाई यांच्याकडून बचत गटाचे २४ हजार रुपये घेऊन निघाले असता, सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान मागून एका मोटार सायकलवर तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी डोळयात चटणी टाकली. त्यामुळे गाडी थांबविली. ती डोळ्यात गेल्याने ढोले हे रस्त्याच्या कडेला थांबून डोळे चोळीत राहिले. इतक्यात तीन अनोळखी व्यक्ती जवळ येऊन शिवीगाळ, दमदाटी करीत पाकीट व मोटारसायकलची चावी व रितेश खंदारे यांच्याजवळील पैशाची बग व मोबाइल काढून घेऊन पळून गेले.

---

आरडाओरड होताच जमले लोक

घटनेदरम्यान ढोले यांच्या डोळ्यात चटणी पडताच त्यांनी आरडाओरड केली. हे ऐकून काही लोक धावून आले. त्यांच्याजवळील व रितेश खंदारे यांच्याजवळील ६०० रुपये, एक पाॅकेट त्यामध्ये ६०० रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड, चावी, २४ हजार रुपये रोख, रितेश खंदारे यांचा मोबाइल असा सुमारे २९ हजार ६०० रुपयांचा ऐवज पळविला.

Web Title: The bank recovered Rs 29,000 by throwing chutney in the eyes of the recovery employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.