बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज द्यावे: निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:40+5:302021-06-26T04:16:40+5:30
इर्लेवाडीचे (ता. बार्शी) उपसरपंच पंकज सरकाळे यांनी खरीप पीक कर्ज संथ गतीने व दुजाभाव करून वाटप होत आहे अशी ...
इर्लेवाडीचे (ता. बार्शी) उपसरपंच पंकज सरकाळे यांनी खरीप पीक कर्ज संथ गतीने व दुजाभाव करून वाटप होत आहे अशी तक्रार खासदार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी वैराग येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे भेट देऊन पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला.यावेळी बँकेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून शाखाधिकारी जी. एम. श्रीधर यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यास सांगितले.
याप्रसंगी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, सुधीर डुरे, वनराज गायकवाड, नितीन काशीद उपस्थित होते. कागदपत्राची तपासणी करून ती लवकरात लवकर पाठवण्यात येतील असे येथील कृषी अधिकारी किरण आवारे यांनी सांगितले.
------
बँकेमधील तांत्रिक अडचण व लाॅकडाऊन यामुळे फाईल लवकर तयार होऊ शकत नव्हती. तसेच थकबाकीदारांची फाईल मुख्य कार्यालयाला पाठवून मंजूर करून घ्यावी लागते. यामुळे काही फाईल थांबल्या आहेत. यामध्ये कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही. कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
-शाखाधिकारी जी. एम. श्रीधर
---
इर्ले व इर्लेवाडी ही गावे बँकेने दत्तक घेतली आहेत. तरी देखील संबंधित अधिकारी हे या गावच्या ठराविक लोकांची प्रकरणे प्रलंबित ठेवतात. चौकशी केली तर तुमची प्रकरणे आली नसल्याचे सांगितले. यावरून संबंधित अधिकारी शेतकऱ्याची पिळवणूक करत असल्याचे दिसते.
- पंकज सरकाळे, सुधीर डुरे, शेतकरी
---
फोटो : २५ वैराग
वैराग येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे भेट देऊन पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला.