विठ्ठल मंदिरात बंदी, सुवासिनींचा नामदेव पायरीजवळ वाणवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:26+5:302021-01-15T04:19:26+5:30

प्रत्यकेवर्षी भोगी व मकर संक्रांतीनिमित्त महिला भाविकांची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते; परंतु यंदा कोरोनाचे संकट ...

Banned in Vitthal temple, Vanavasa near Namdev step of Suvasini | विठ्ठल मंदिरात बंदी, सुवासिनींचा नामदेव पायरीजवळ वाणवसा

विठ्ठल मंदिरात बंदी, सुवासिनींचा नामदेव पायरीजवळ वाणवसा

googlenewsNext

प्रत्यकेवर्षी भोगी व मकर संक्रांतीनिमित्त महिला भाविकांची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते; परंतु यंदा कोरोनाचे संकट सर्वांवर ओढावले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन सुरू ठेवले आहे. मुखदर्शनही मोजक्याच लोकांना उपलब्ध करून देण्यात आले.

त्याचबरोबर भोगी व संक्रांतीनिमित्त मंदिरात महिलांची वाणवसा करण्यासाठी गर्दी होऊ नये. गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यामुळे मंदिरात वाणवसा करण्यास बंदी केली होती. कोरोनाचे संकट असून देखील इतर जिल्हा, पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली. आलेल्या सर्व सुवासिनी महिलांनी मंदिरात जाण्याचा हट्ट न करता, श्री संत नामदेव पायरीसमोरच एकमेकींना ओवसून आपली संक्रांत साजरी केली.

फोटो

१४पंढरपूर-वानवसा

ओळी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असल्याने नामदेव पायरीसमोर वाणवसा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. (छाया : सचिन कांबळे)

Web Title: Banned in Vitthal temple, Vanavasa near Namdev step of Suvasini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.