बनसोडे यांच्या विजयात ‘मोदी कार्ड’

By admin | Published: May 17, 2014 01:14 AM2014-05-17T01:14:17+5:302014-05-17T01:14:17+5:30

सोलापूर मतदारसंघ : शहर उत्तरमध्ये ४१९१३ चे तर मध्यला १९ हजारांचे मताधिक्य

Bansode's 'Modi card' | बनसोडे यांच्या विजयात ‘मोदी कार्ड’

बनसोडे यांच्या विजयात ‘मोदी कार्ड’

Next

सोलापूर :सोलापुरात मोदींची लाट नाही, केवळ सुशीलकुमारांची लाट आहे़़़’, असे खुद्द शिंदे यांनी बोलून दाखविले होते; मात्र मोदी लाटेमुळेच शिंदे यांना पराभवाची चव चाखावी लागली़ गाफील नेते, अतिआत्मविश्वास, मतदारांमध्ये असलेला प्रचंड राग, रखडलेल्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष आणि मोदींची त्सुनामी लाट यामुळेच बलाढ्य नेते समजल्या जाणार्‍या शिंदेंना हार पत्करावी लागली़ अ‍ॅड़ शरद बनसोडे यांना तब्बल दीड लाख मताधिक्याने विजय मिळाला़ हे क्रेडिट काही जण वगळता भाजपा-सेनेचे नसून ते केवळ मोदींचेच आहे, हे निश्चित़ शहर मध्य आणि मोहोळ मतदारसंघातून शिंदे यांना खूप मताधिक्य मिळेल, असा विश्वास अनेकांना वाटत होता; मात्र या दोन्ही मतदारसंघांत त्यांना दगाफटका झाला आहे़आ़ प्रणिती शिंदे यांनी, शहर मध्य मध्ये कोणीही फिरू नका, मी साहेबांना दीड लाखाचे लीड देणार आहे असे जाहीर केले होते; मात्र येथे बनसोडे यांनाच १९ हजार ३६९ चे मताधिक्य मिळाले आहे़ भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मतदारसंघात गेल्या खेपेस सुमारे सात हजारांचे मताधिक्य होते; मात्र येथे यंदा बनसोडे यांना तब्बल ४१ हजार ९१३ चे मताधिक्य मिळाले आहे़ आ़ दिलीप माने यांच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात बनसोडे यांनी शिंदे यांच्यापेक्षा २७ हजार ८२१ चे मताधिक्य मिळविले आहे़अक्कलकोटमध्ये २५ हजार ८०८ चे तर मोहोळमध्ये १३ हजार ४४२ चे मताधिक्य बनसोडे यांनी मिळविले आहे़ पंढरपूर आणि मंगळवेढ्यातून यंदा शिंदे यांना फटका बसला आहे़ येथे बनसोडे यांना १६ हजार ७११चे मताधिक्य मिळाले आहे़ आम्ही शिंदेंना दोन लाखांचे मताधिक्य देऊ, नाही तर राजकारण सोडतो, असे सुधीर खरटमल म्हणाले होते; तर ५० हजार मतांनी शिंदे विजयी होणारच, असा दावा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केला होता़ काहीकेल्या शिंदे किमान १५ हजार मतांनी येतील, नाही तर महापालिकेत पाय ठेवणार नाही, असे वक्तव्य माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केले होते़ या सर्वांचे दावे फोल ठरले आहेत़ मतदारसंघातील हवा या नेत्यांच्या लक्षात आलीच नाही, हे विशेष़ महायुतीच्या नेत्यांनी प्रचार केला काय, नाही काय, जनतेने मोदी सरकारकडे पाहून बनसोडे यांना विजयी केले़एकाही मतदारसंघात शिंदेंना मताधिक्य मिळू नये, हे दुर्दैव़ सेना, भाजपा आदी नगरसेवक, पदाधिकारी प्रचारमोहिमेमध्ये आक्रमकपणे दिसत नसतानाही जनतेने भाजपाला निवडून दिले, हे विशेष़

Web Title: Bansode's 'Modi card'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.