बापरे... मृत्यूच्या घोळाबाबत सोलापुरातील आरोग्य अधिकाºयाला बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 08:19 AM2020-06-23T08:19:22+5:302020-06-23T08:21:37+5:30
विभागीय आयुक्तांच्या बैठकीसाठी चुकीची माहिती दिल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई...!
सोलापूर : कोरोनाने मृत्यू पावलेल्या आकडेवारीबाबत खुलासा सादर करावा अशी नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांना बजाविल्यावर धावपळ उडाली अन सोमवारी तब्बल ३५ मृतांची नव्याने नोंद घेण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे २३ जून रोजी सोलापूर दौºयावर येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाने मृत पावलेल्यांची आकडेवारी मागविली होती. २१ जून रोजी महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या १९६ इतकी दाखविली आहे. पण कोव्हिड पोर्टलवर ही आकडेवारी १६१ दाखवित होती. कोरोनाने १९६ मृत्यू झालेले असताना पोर्टलवर चुकीची आकडेवारी का दाखविली याचा खुलासा करावा व १९६ मृत्यूच्या अनुषंगाने मृत्यूचा आॅडिट रिर्पोट सादर करावा आणि पोर्टलवरील माहिती आद्ययावत करावी असे २२ जून रोजी दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही नोटीस दिल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागात धावपळ उडाली. पोर्टलवर माहिती अपलोड करणाºया डॉक्टरांनी माहितीच भरली नसल्याचे उघड झाले आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशकर यांनी याची दखल घेत माहिती न भरणाºया डॉक्टरांना नोटीस बजावली. पण अचानक आकडेवारीत वाढ झाल्याने सोलापुरात हा चर्चेचा विषय झाला आहे. खाजगी हॉस्पीटलकडून आलेल्या मृताची वेबसाईटवर नोंद दाखविली गेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र मृत्यू झाल्यानंतर अनेकांचा अंत्यविधी झाला तरी त्या मृत्यूची घोषणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकाºयांचे स्पष्टीकरण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आकडेवारीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने शोध घेतल्यावर सोलापुरातील आकडेवारीत ५१ ने वाढ असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी या वाढीव आकडेवारीचा इन्कार केला होता. जिल्हा प्रशासनाने पारदर्शकपणे हॉस्पीटलकडून येणारी खरी माहिती प्रसिद्ध केल्याचा दावा केला होता. पण आता महापालिकेतील गोंधळामुळे काही नावाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर या गोंधळाची कशी दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे बुधवारी फडणवीस सोलापूर दौºयावर आहेत.