बापरे..दहावीतील विद्यार्थी आला पॉझिटिव्ह; कवठे निवासी आश्रम शाळेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:50 AM2021-03-11T10:50:32+5:302021-03-11T12:19:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर: दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन घेण्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील निवासी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थी पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत, त्याचबरोबर कोरोना उपाय योजना संदर्भात कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी तिर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने कवठे येथील आश्रम शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी केली असता दहावीतील एक विद्यार्थी पॉझिटिव आला आहे. या अनुषंगाने त्याच्या संपर्कातील इतर विद्यार्थी व शिक्षक अशा 55 जणांची चाचणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यास विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊतराव, आनंद गोडसे यांच्या पथकाने ही तपासणी केल्याचे सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी येथील दिव्यांग आश्रम शाळेतील 46 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याने शिक्षण व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.