बारमधील वेटरला रिक्षातून पळवून नेले, सर्वांगास चटके देऊन बेदम मारहाण

By विलास जळकोटकर | Published: November 25, 2023 03:56 PM2023-11-25T15:56:50+5:302023-11-25T15:56:59+5:30

सोलापुरात  धक्कादायक प्रकार, सात जणांविरुद्ध गुन्हा

bar waiter from was abducted in a rickshaw severely beaten | बारमधील वेटरला रिक्षातून पळवून नेले, सर्वांगास चटके देऊन बेदम मारहाण

बारमधील वेटरला रिक्षातून पळवून नेले, सर्वांगास चटके देऊन बेदम मारहाण

सोलापूर: बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या १७ वर्षाच्या वेटरला मुलींची छेड काढते असे कारण देत रिक्षातून पळवून नेले. त्याला पाईपनं आणि सर्वांगास चटके देऊन जखमी केले. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ओमशांती बियर बारसमोरच्या मैदानात ही घटना घडली. बबलू श्रीनिवास संगा (वय- १७, रा. माळीनगर, एमआयडीसी रोड, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.

जखमी बबलूच्या फिर्यादीनुसार गणेश, बबलू, विकास, बसू यांच्यासह दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत बबलू संगा याने म्हटले आहे की, यातील तो माळीनगर येथे आई, लहान भावासमवेत राहतो. एमआयडीसी परिसरातील बिअरबारमध्ये तो वेटर म्हणून कामाला आहे. बारच्या बाजूला विकास याची टपरी आहे तेथे बबलू व गणेश कामाला आहेत. २१ नोव्हेंबर रोजी बारच्या पाठिमागे राहणाऱ्या महिलांनी फिर्यादीला गल्लीतील मुुलींची छेड काढतो म्हणून शिवगाळ केली होती. घाबरुन फिर्यादी मावशीकडे गेला होता.
दुसऱ्या दिवशी अरफान नगर येथील मावशीकडे फिर्यादी गेला असता ओळखीचा गणेश व अनोळखी दुचाकीवर आले त्यांनी काम असल्याचे सांगून दुचाकीवर बसवून नेले. बारसमोरील मैदानात आणून कपडे फाडले. फायबरच्या पाईने व लोखंडी सळई तापवून सर्वांगास चटके दिले.

या प्रकारानंतर बार मालकाला समजाच त्यांनी फिर्यादीच्या आईला बोलावून घेतल्यावर आईने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास सपोनि कुकडे करीत आहेत.

Web Title: bar waiter from was abducted in a rickshaw severely beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.