पंढरपूरला येणारे ४५ टक्के पाणी बारामतीकरांनी पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:25+5:302021-04-06T04:21:25+5:30
यावेळी माजी राज्यमंत्री बाळू भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, बादलसिंह ठाकूर उपस्थित होते. पुढे निंबाळकर म्हणाले, २०१४ पासून केंद्र ...
यावेळी माजी राज्यमंत्री बाळू भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, बादलसिंह ठाकूर उपस्थित होते. पुढे निंबाळकर म्हणाले, २०१४ पासून केंद्र सरकारने पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते काँक्रिटीकरण केले आहेत. मात्र, पंढरपुरात संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. परंतु, गेल्या दीड वर्षापासून सरकारने पंढरपुरात काय विकासकामे केली हे त्यांनीच डोळ्यांखालून घालावी. भालकेंच्या मृत्यूचे भांडवल करून अनुकंपाखाली आमदारकीची जागा भरायला एस.टी. महामंडळ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भालकेंच्या निधनानंतर त्यांनी ३५ गावच्या पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद केली नाही. २०१४ च्या आचारसंहितेच्या पूर्वी मी व भालके यांनी ३५ गावच्या पाणी प्रश्नाच्या प्रस्तावावर राज्यपालांची सही घेतली असल्याची आठवण खा. निंबाळकर यांनी करून दिली.
---
पोटनिवडणूक बिनविरोधचा दिला होता निरोप
सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करून दिवंगत भारत भालके यांच्या पत्नींना निवडून देऊ, असा निरोप प्रशांत परिचारकांनी दिला होता. परंतु, राष्ट्रवादीच्या लक्षात आला, असे खा. नाईक-निंबाळकरांनी स्पष्ट केले.