बार्शीत राष्ट्रीय महालोकअदालतीत १०० प्रकरणे तडजोडीने निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:07+5:302020-12-13T04:37:07+5:30

यामध्ये वाटप, पोटगी, रस्ते, बांधाचे वाद, जागेची मालकी जाहीर करणे, मोटार वाहन अपघात, बँकांची व महावितरणची वसुलीची, दिवाणी व ...

In Barshi, 100 cases were settled amicably in the National High Court | बार्शीत राष्ट्रीय महालोकअदालतीत १०० प्रकरणे तडजोडीने निकाली

बार्शीत राष्ट्रीय महालोकअदालतीत १०० प्रकरणे तडजोडीने निकाली

Next

यामध्ये वाटप, पोटगी, रस्ते, बांधाचे वाद, जागेची मालकी जाहीर करणे, मोटार वाहन अपघात, बँकांची व महावितरणची वसुलीची, दिवाणी व फौजदारी प्रकरणे आदींचा समावेश आहे.

या महालोकअदालतीसाठी तीन पॅनल केले होते. यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तेजवंतसिंह संधू, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर. एस. धडके यांच्या पॅनलचा समावेश होता.

महालोकअदालत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. काकासाहेब गुंड, तडजोडीच्या पॅनलवरील वकील सर्वश्री पी. सी. सुतकर, एस. आर. मुकेरी, पी. एस. जाधव, आर. डी. तारके, शीतल गुंड, व्ही. एस. वाघमारे, जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहायक अधीक्षक डी. एस. अडसुळे, वरिष्ठ लिपिक एम. ए. पानगावकर, एम. ए. पोतदार यांनी परिश्रम घेतले.

व्हिडीओ कॉलद्वारे ९ प्रकरणे निकाली

महालोकअदालतीमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांनी एकूण ६० प्रकरणे तडजोडीत निकाली काढली. यामध्ये व्हाॅट्‌सॲप व्हिडीओ कॉलद्वारे ९ पक्षकारांची पडताळणी करून प्रकरणे निकाली काढली. यामध्ये ॲड. विकास जाधव यांच्या काही प्रकरणांचा समावेश होता. तसेच एक ७० वर्षांचे अपंग पक्षकार प्रताप भोसले होते की, ज्यांना चालता येत नव्हते. त्यांच्यासाठी स्वतः न्यायाधीश संधू हे पॅनल सदस्यांसोबत न्यायालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. तडजोडीची खात्री करून घेतली आणि प्रकरण निकाली काढले, असे ॲड. रणजित गुंड-पाटील यांनी सांगितले.

अशाच प्रकारे आणखी एका प्रकरणात न्या. संधू यांनी कोर्ट आवारातील गाडीजवळ जाऊन अपंग व्यक्तीची खात्री करून पक्षकाराच्या न्यायासाठी सोयीस्कर भूमिका घेत सामाजिक बांधिलकी जपल्याचे ॲड. राहुल गुंड यांनी सांगितले.

फोटो

१२बार्शी-कोर्ट

ओळी

न्या. संधू हे स्वत: न्यायालयाबाहेर येऊन गाडीजवळ जाऊन अपंग पक्षकाराची साक्ष घेतली.

Web Title: In Barshi, 100 cases were settled amicably in the National High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.