बार्शीत २७ ग्रामीणमध्ये ११ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:29+5:302021-03-04T04:41:29+5:30
बार्शी : बार्शी शहरात आठ-दहा दिवसांत मंदावलेला कोरोनावाढीचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोमवार, मंगळवार या ...
बार्शी : बार्शी शहरात आठ-दहा दिवसांत मंदावलेला कोरोनावाढीचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत बार्शीत २७, तर ग्रामीण भागात ११ अशा ३८ रुग्णांची वाढ झाली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे़ अनेक जण अद्यापही मास्क घालत नसल्याचे दिसत आहे़ गेल्या दोन दिवसांत शहर व तालुक्यात पुन्हा ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सोमवारी बार्शी शहरात ११ आणि ग्रामीण मध्ये ८, तर मंगळवारी शहरात १६, तर ग्रामीणमध्ये तीन असे सलग दोन दिवसांत शहरात २७ रुग्ण आढळून आले आहेत़ तर, ग्रामीण भागात ११ आढळले आहेत़ हे रुग्ण वाढण्यामागे शहरात होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गर्दी हेच मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.
----
आजवरचा बाधित आकडा ५५३१
या ३८ रुग्णांमुळे आजवरच्या बधित रुग्णांचा आकडा हा ५५३१ झाला आहे़ सध्या ४७ जणांवर उपचार सुरू आहेत़ १२० जण गृहविलगीकरणात आहेत आणि १८० जणांचा अद्यापपर्यंत मृत्यू झाला आहे़ ५१८४ जण आतापर्यंत बरे झाले आहेत़
---