बार्शीतील मटका टोळी हद्दपार

By admin | Published: June 26, 2017 08:14 PM2017-06-26T20:14:56+5:302017-06-26T20:14:56+5:30

अवैध मटका, जुगार व्यवसाय करणाºया टोळीप्रमुख महेश अरविंद यादव याच्यासह पाच जणांना सोमवारी पोलीस अधीक्षकांनी

Barshi Ban Ki-moon exile | बार्शीतील मटका टोळी हद्दपार

बार्शीतील मटका टोळी हद्दपार

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २६ - अवैध मटका, जुगार व्यवसाय करणाºया टोळीप्रमुख  महेश अरविंद यादव  याच्यासह पाच जणांना सोमवारी पोलीस अधीक्षकांनी एक वषार्साठी जिल्ह्यातून हद्दपार केले. या टोळीविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्याने हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक विरेश प्रभु यांनी ही कारवाई केली.
महेश अरविंद यादव (वय ३९,रा. रोडगा रस्ता बार्शी), गणी बाशा सय्यद (वय ३९,रा. मांगडे चाळ बार्शी), हनुमंत दगडू नाईक (वय ४५,रा. आगळगाव रोड, बार्शी),  मन्सूर युसूफ पठाण (वय ३९,रा. आशा टॉकीज जवळ बार्शी), संजू बाबूराव बारटक्के (वय ४७) अशी हद्दपार केलेल्या टोळीतील इसमांची नावे आहेत.
 या टोळी विरुध्द सरकाळी कामात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे,  मारहाण व शिवीगाळ , मटका जुगार व्यवसाय करणे असे गुन्हे बार्शी पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.  आपले अवैध धंदे सुरळीत चालावेत व कोणी त्यांना अडथळा करुन नये म्हणुन सर्वसामान्य लोकांमध्ये भय व दहशत निर्माण केली होती. त्याच्या अवैध कृत्यामुळे बार्शी शहरातील सर्वसामन्य जनता त्रस्त झाली होती.  पोलीस अधिक्ष विरेश प्रभु यानी सदर टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांचा बिमोड करण्यासाठी एक वर्षा करीता हद्दपार केले आहे.

Web Title: Barshi Ban Ki-moon exile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.