१०० बेडचे कोविड सेंटर उभारणारी बार्शी बाजार समिती जिल्ह्यातील पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:53+5:302021-05-15T04:20:53+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फळे भाजीपाला मार्केट येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटरचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ...
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फळे भाजीपाला मार्केट येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटरचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन झाले, त्यावेळी सोनी ते बोलत होते.
याप्रसंगी निबंधक कुंदन भोळे, प्रांताधिकारी हेमंत निकम, आमदार राजेंद्र राऊत, सभापती रणवीर राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, तहसीलदार सुनील शेरखाने, सहायक निबंधक अभय कटके, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.
कुंदन भोळे म्हणाले, शासनाच्या आदेशाचे पालन करुन शेतकरी आणि नागरिक यांच्यातील सामाजिक बांधीलकीचे नाते दाखवून देत समितीने कोविड सेंटर उभा केले आहे. प्रशासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असेल. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुभेच्छा संदेश पाठवून संकटकाळी बाजार समितीने शासनाच्या पाठीशी उभा राहून शासनास सहकार्य केल्याचे म्हटले आहे.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, जिल्हा प्रशासनाने मदत केल्यामुळे कोविड सेंटर लवकर उभा राहिले. शेतकरी, नागरिकांची औषधोपचारासह नाष्टा, पाणी, जेवण पूर्णतः मोफत सोय केली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक १३ कोविड सेंटर बार्शीत
जिल्ह्यात सर्वाधिक १३ कोविड सेंटर बार्शी तालुक्यात असून ७५० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. आपण रुग्णसेवेला कमी पडलो नाही. डॉक्टर, परिचारिका, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मोठे नेटवर्क उभा करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी अनेकांचे प्राणही वाचले आहेत. त्यामुळे कोरोनाला कोणी घाबरू नका. या संकटातून लवकर बाहेर पडू, असे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले.
फोटो
१४बार्शी-बाजार समिती
ओळी
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत उभारलेल्या १०० बेडच्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आ. राजेंद्र राऊत, सभापती रणवीर राऊत, कुंदन भोळे, हेमंत निकम, विश्वास बारबोले आदी.