बार्शीतील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याच्या टोळीला सोलापूर जिल्हयातून दोन वर्षासाठी केले तडीपार
By Appasaheb.patil | Published: April 3, 2023 04:45 PM2023-04-03T16:45:37+5:302023-04-03T16:47:18+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्हयातील बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा ...
सोलापूर : सोलापूर जिल्हयातील बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, अपरहरण करणे, खंडणी मागणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या विशाल रणदिवे व टोळीतील 5 जणांना सोलापूर जिल्हयातून दोन वर्षाकरीता हददपार केले आहे.
टोळी प्रमुख विशाल विठठल रणदिवे, टोळी सदस्य बाबा सुरेश खंडागळे, नारायण मच्छिंद्र लोंखडे, विनोद उर्फ विनायक श्रावण पवार, विक्रम रमेश पारडे (सर्व रा. झाडबुके मैदान, बार्शी) नागेश उर्फ बक्शा हिरा गवळी, (रा. लहुजी वस्ताद चौक, बार्शी) असे तडीपार केलेल्याची नावे आहेत. तरी याव्दारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नमुद हद्दपार हे त्यांना हदद्पार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे.
सदरचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे. अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगतपा, पो.नि. संतोष गिरीगोसावी, स.पो.नि. तोरडमल, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील व बार्शी शहर पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केला आहे.