बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जाहीर, बार्शीसह सोलापुरातही स्वीकारणार हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:30 PM2018-03-01T14:30:41+5:302018-03-01T14:30:41+5:30
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे.
राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार बार्शी बाजार समितीची निवडणूक होत आहे. तहसीलदारांनी प्रारुप मतदार यादी तयार केली आहे. ही यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. मतदार यादीतील नाव, वय, पत्ता याबाबत उद्यापासून १० दिवस पुराव्यानिशी हरकती दाखल करता येतील. उच्च न्यायालयाने एप्रिलच्या मध्यावतीत बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. सध्याची प्रक्रिया पाहता बार्शी बाजार समितीची निवडणूक मुदतीत होणार नाही.
------------------------
घोळाची परंपरा कायम
च्बाजार समितीची मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविण्यात आली होती. महसूल यंत्रणेने आजवर ७/१२ उताºयावरील नोंदीमध्ये घोळ घातल्याची उदाहरणे आहेत. या घोळातून गावागावात, घराघरात वाद सुरू आहेत. ही परंपरा बाजार समितीच्या मतदार यादीमध्येही कायम ठेवण्यात आली आहे. बाजार समितीचे दावेदार सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीपराव माने यांच्यासह हजारो मतदारांचे वय चुकीचे टाइप करण्यात आले आहे. एकाच मतदाराचे नाव अनेक ठिकाणी आहे. सोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील १०७ मतदारांवर उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीमंत बंडगर यांनी हरकत घेतली. सर्व मतदार थकबाकीदार असल्याने त्यांची नावे वगळण्यात यावी, अशी हरकत त्यांनी दाखल केली आहे. या हरकतीच्या सुनावणीकडे लक्ष असेल.
---------------
प्रारुप मतदार संख्या
च्आगळगाव ४६३०, पांगरी ५२८४, उक्कडगाव ५२६१, जामगाव ५६७९, उपळाई ठोंगे ५४४१, मळेगाव ४९५०, कारी ४४५९, उपळे दु. ४९७३, घाणेगाव ५६२१, पानगाव ५०५५, श्रीपतपिंपरी ४९३८, सुर्डी ४९३८, सासुरे ५३३०, शेळगाव ४७३८, भालगाव ५१६१. हमाल/ तोलार ९३०, व्यापारी ४६४.
----------------
--------------------
येथे पाहता येईल मतदार यादी
च्बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालय, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, तहसील कार्यालय बार्शी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय. या यादीवरील हरकती बार्शी तहसील कार्यालयाबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही स्वीकारण्यात येणार आहेत.