वेतनासाठी बार्शी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा शंखनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:37+5:302020-12-31T04:22:37+5:30
यावेळी शासनास तातडीने अनुदान देण्यासाठी निवेदनही दिले. जकात बंद झाल्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांना पगार करण्यासाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना सहायक अनुदान ...
यावेळी शासनास तातडीने अनुदान देण्यासाठी निवेदनही दिले. जकात बंद झाल्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांना पगार करण्यासाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना सहायक अनुदान दिले जाते. हे अनुदान दर महिन्याच्या १ तारखेला जमा होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे अनुदान मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याची वीस तारीख उजाडते. गेली दोन वर्षांपासून या नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे.
कर्मचाऱ्यांनी हे अनुदान मिळेपर्यंत दररोज सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बोंबाबोंब करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी बहुसंख्येने कर्मचाऱ्यांनी शंखनाद करीत संताप व्यक्त केला. या आंदोलनात स्थापत्य विभाग प्रमुख भारत विधाते, विद्युत विभागप्रमुख अविनाश शिंदे, संतोष बोकेफोडे, चिपडे, पाटोळे, भगवान बोकेफोडे, दिनेश पवार यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.
फोटो: ३०बार्शी-आंदोलन