जागतिक रेस टू झीरो अभियानात बार्शी नगरपालिकेला मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:16+5:302021-09-27T04:24:16+5:30

बार्शी : नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली ...

Barshi municipality ranked in World Race to Zero campaign | जागतिक रेस टू झीरो अभियानात बार्शी नगरपालिकेला मानांकन

जागतिक रेस टू झीरो अभियानात बार्शी नगरपालिकेला मानांकन

googlenewsNext

बार्शी : नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक रेस टू झीरो अभियानात सहभागी होण्यासाठी बार्शी शहराला नामांकन दिल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी यांनी दिली.

बार्शी नगर परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धा २०२१ मध्ये महानगरपालिका गटामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे. बार्शी शहरातील वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी बार्शी नगर परिषद, वृक्षप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आदींच्या सहकार्याने हरित बार्शी करण्यास मदत होत आहे. मागील सरकारच्या काळात शासनाने राबविलेले १ कोटी वृक्षलागवड अभियान राबवत असताना, आजपर्यंत बार्शी शहर, तालुक्यात वनविभाग व वृक्षप्रेमी नागरिकांच्या बैठका घेऊन त्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन व जनजागृती करण्यात आली. यामुळेच बार्शी नगर परिषदेस माझी वसुंधरा स्पर्धा २०२१ मध्ये पारितोषिक मिळाले.

आता जागतिक रेस टू झीरो अभियानात सहभागी झाल्यामुळे निश्चितच सर्व वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. या स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून, सर्व बार्शीकर नागरिकांच्या सहभागातून या स्पर्धेत आपण नक्कीच पारितोषिक मिळवू, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.

Web Title: Barshi municipality ranked in World Race to Zero campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.