बार्शी पंचायत समिती; सभापतीपदी अनिल डिसले तर उपसभापतीपदी मंजुळा वाघमोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:17 PM2019-12-31T13:17:50+5:302019-12-31T13:19:37+5:30

बार्शी : आगामी दोन वर्षासाठी बार्शी पंचायत समितीचे सभापतीपदी आमदार राजेंद्र राऊत गटाचे (भाजप) शेळगाव आर पंचायत समिती गणातील ...

Barshi Panchayat Samiti; Anil Dissel as chairman and Manjula Waghmode as deputy chairman | बार्शी पंचायत समिती; सभापतीपदी अनिल डिसले तर उपसभापतीपदी मंजुळा वाघमोडे

बार्शी पंचायत समिती; सभापतीपदी अनिल डिसले तर उपसभापतीपदी मंजुळा वाघमोडे

googlenewsNext
ठळक मुद्देसभापती व उपसभापती निवडीसाठी आज पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठकसभापती व उपसभापती पदासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी सहकाºयांसोबत चर्चा निवडीनंतर बार्शी पंचायत समिती आवारात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष

बार्शी : आगामी दोन वर्षासाठी बार्शी पंचायत समितीचे सभापतीपदी आमदार राजेंद्र राऊत गटाचे (भाजप) शेळगाव आर पंचायत समिती गणातील सदस्य अनिल डिसले तर उपसभापतीपदी भाजपच्या मंजुळा वाघमोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सभापती व उपसभापती निवडीसाठी आज पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठक आज पार पडली. तत्पूर्वी सभापती व उपसभापती पदासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी सहकाºयांसोबत चर्चा करून डिसले व वाघमोडे यांची नावे निश्चित केली. या निवडीनंतर बार्शी पंचायत समिती आवारात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मागील तीन वषार्पुर्वी झालेल्या बार्शी पं.स.च्या निवडणुकीत गेल्या पंधरा वषार्पासून पंचायत समितीवर सत्ता असलेले सत्ताधारी आ. राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे १२ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत तर आ. दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेस चे ५ पंचायत समिती सदस्य निवडून आले होते.

Web Title: Barshi Panchayat Samiti; Anil Dissel as chairman and Manjula Waghmode as deputy chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.