बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:43 PM2024-10-29T14:43:14+5:302024-10-29T14:43:14+5:30

भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. 

Barshi Rajendra Raut switched parties Still tension due to manoj Jarange patil factor | बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्या पक्षाचे उमेदवारी मिळवली हे खरे असले तरी त्यांच्या या पक्ष बदलाचा त्यांना फायदा होणार की तोटा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण गेल्या दोन महिन्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या भडीमाराची आठवण आजही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात मराठा आंदोलन काढत आहेत. 

आमदार राजेंद्र राऊत हे मागील सात वर्षांपासून भाजपकडे आहेत. अनपेक्षितपणे भाजप नेतृत्वावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा असलेला राग, त्यातच आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील महिन्यामध्ये त्यांच्याविरोधात पत्रकार परिषदेत घेऊन केलेले आरोप यामुळे आमदार राजेंद्र राऊत राज्यात चर्चेत आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या या नव्या पक्षातील उमेदवारीच्या तालुक्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी अकस्मातपणे हातात धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्जही भरला आहे. मागील एक वर्षांपासून मराठा आंदोलनात सक्रिय असणाऱ्या मराठा आंदोलकांना हे पटणार का, मराठा कार्यकर्त्यांसोबत मराठा मतदारांनादेखील त्यांचा हा निर्णय रुचणार की नाही हे आगामी काळात समजणार आहे.

"इथे अशी परिस्थिती आहे की पक्षचिन्ह बदलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी ही जागा शिवसेनेची होती. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. मनुष्य आमचा चिन्ह तुमचा अशी पॉलिसी वरच्या पक्षाने राबविली आहे. कमळाला जरांगे पाटलांचा विरोध आहे असे दिसत आहे. योगायोगाने त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळेल का तर सध्या राज्यातील सहाही पक्ष आमचे विरोधक आहेत. बाणांचा त्यांना फक्त एक टक्का फायदा होईल. राज्याचे मराठा आंदोलन सेन्सिटिव्ह करणारा बार्शी तालुका आहे. जरांगे पाटील यांचा जो आदेश असेल तो मराठा समाज शंभर टक्के पाळणार आहे. जरांगे पाटलांची मान खाली जाईल, असा इथला समाज वागणार नाही," अशी प्रतिक्रिया बार्शीतील मराठा आंदोलक विनायक घोडके यांनी दिली आहे.

Web Title: Barshi Rajendra Raut switched parties Still tension due to manoj Jarange patil factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.