जलवाहिनी फोडणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी बार्शीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:31+5:302021-07-10T04:16:31+5:30
बार्शी : शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि जलवाहिनी फोडून पाणी चोरी करणाऱ्यावर कारवाई करावी, या मागण्यांसाठी अप्पासाहेब पवार व ...
बार्शी : शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि जलवाहिनी फोडून पाणी चोरी करणाऱ्यावर कारवाई करावी, या मागण्यांसाठी अप्पासाहेब पवार व संतोष कळमकर यांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला दहा दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
त्या दोघांनी मंगळवार पेठेतील धर्मवीर संभाजी चौक-स्मशानभूमी हा रस्ता डांबरीकरण व्हावा या मागणीसाठीही आंदोलन सुरू केले आहे. याबाबत नगराध्यक्ष आसीफ तांबोळी यांनी भेट घेऊन या डांबरीकरणास मंजुरी असून त्यासाठी वर्क ऑर्डर झाली आहे. निधी उपलब्ध होताच काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिले होते, तर नगरसेवक विजय राऊत यांनीही आठ दिवसांत डांबरीकरण कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, काम सुरू झाले नाही.
----
फोटो : ०९ बार्शी
बार्शी नगरपालिकेसमोर आंदोलन करताना अप्पासाहेब पवार, संतोष कळमकर, दयानंद पिंगळे.