बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघाला ग्रामीण प्रीमियर लीग टी-२० चे विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:24 AM2021-09-11T04:24:10+5:302021-09-11T04:24:10+5:30
या स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदवला. साखळी प्रकारच्या या स्पर्धेमध्ये बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या संघाने सर्व सामने जिंकत अंतिम ...
या स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदवला. साखळी प्रकारच्या या स्पर्धेमध्ये बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या संघाने सर्व सामने जिंकत अंतिम विजेतेपद पटकावले. बार्शीच्या इतिहासात प्रथमच बार्शीच्या संघाने विजेतेपद पटकावले.
बार्शीच्या संघाने पहिला सामना सांगोला संघाचा नव्वद धावांनी पराभव करून जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात बार्शी विरुद्ध पंढरपूर या सामन्यामध्ये बार्शीने ११० धावांनी जिंकला, तर तिसऱ्या सामन्यात अक्कलकोटचा ६१ धावांनी पराभव केला. चौथा सामना सांगोला संघाबरोबर झाला, यात ५ विकेट राखून तो जिंकला. अशारीतीने बार्शी संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये नांदणीच्या संघाचा ४४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना पंढरपूरसोबत झाला. यामध्ये बार्शी संघाने तब्बल ५० धावांनी जिंकत ग्रामीण प्रीमियर लीग टी-२० चे विजेतेपद पटकावले.
हा आहे विजेता संघ
भगवंत आदलिंगे (कर्णधार), सर्जेराव मोहिते, आतिश जाधव, साईराज पिंगळे, विवेक दुग्गम, अनिकेत कदम, सूरज घावटे, सूरज ठोंबरे, प्रवीण माने, श्रेयस घाडगे, रणजीत गायकवाड, संकल्प कांबळे, समर्थ गव्हाणे, प्रज्वल जाधवर, आणि अमर शेंडगे यांनी योगदान दिले. या संघास स्वप्निल अंधारे यांनी मार्गदर्शन केले.
- स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून भगवंत आदलिंगे ७ विकेट आणि १८२ धावा तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून साईराज पिंगळे १८९ धावा आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून तेरा विकेट घेतल्या. आतिश जाधव या बार्शी संघातील खेळाडूचा गौरव करण्यात आला.
या विजयाबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सचिव चंद्रकांत रेम्बर्सू, उदय डोके, बार्शी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, तालुका सचिव प्रा. किरण देशमुख व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
----