कोविड योद्ध्यांचे दातृत्व बार्शीकर विसरणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:52+5:302021-02-10T04:21:52+5:30
बार्शी : कोरोना काळातील लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून बार्शीत विविध ठिकाणी अन्नछत्रालय सुरू झाली. या अन्नछत्रालयांचे ...
बार्शी : कोरोना काळातील लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून बार्शीत विविध ठिकाणी अन्नछत्रालय सुरू झाली. या अन्नछत्रालयांचे सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. पोलीस, आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि पत्रकारांनीही कौतुकास्पद काम केल्याने लॉकडाऊनमध्ये या कोविड योद्ध्यांनी दाखवलेल्या दातृत्वाचे आणि कर्तृत्वाचे बार्शीकरांवर ऋण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी करून कोविड योद्ध्यांच्या कामाचे कौतुक केले.
आझाद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, विरोधी नेते नागेश अक्कलकोटे, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, पोलीस हवालदार खराडे, नगरसेवक पृथ्वीराज राजपूत, नगरसेवक पिंठू माळगे, नगरसेवक प्रशांत माने उपस्थित होते.
कोरोनाच्या भीतीनं अनेक माणसं मृत्युमुखी पडली. या काळात परिस्थितीचीचं गांभीर्य ओळखून शहरातील विविध अन्नछत्रालयांनी केलेल्या कामाची इतिहासात नोंद घेतली आहे. येणाऱ्या संकटाला बार्शीकर नेहमीच धावून जातो, कोरोनाचे संकट आता कमी झालेय, पण भीती अद्याप संपलेली नाही अशी भीती व्यक्त करीत त्यांनी निर्भय बार्शी-स्वच्छ बार्शी, धूळमुक्त, धूरमुक्त बार्शी आणि खड्डेमुक्त बार्शीचा संकल्प सोपल यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला.
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकरांनी कोरोना काळातील कटू-गोड आठवणींना उजाळा दिला. लॉकडाऊन काळातील भीषण वास्तव त्यांनी सांगून अन्नदानासह इतरही कामे आम्ही केली, पण लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालविण्याचे काम आम्ही केले, असे भाऊसाहेब यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीही मनोगतातून कोरोनाची भीती आता संपलीय म्हणाले, पण त्याकाळात रस्त्यावर येऊन ज्यांनी काम केले, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वीतेसाठी लखन राजपूत, कुणाल नरके, रूपशे सदावर्ते, रामचंद्र ढोले, सागर शिराळ, राम गलांडे, ओंकार घोंगडे, संतोष खोगरे यांसह मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
भाऊसाहेब आंधळकर यांनी केवळ अन्नछत्रच नाही तर, रुग्णालयात रुग्णासाठी धडपड केली. त्यांच्या विविध कामांची दखल घेत भाऊसाहेब आंधळकर यांना 'कोविड महायोद्धा' म्हणून गौरविण्यात आले.
---
अन्नछत्रालयांचा गौरव
याबरोबरच कोविड योद्धा म्हणून अंबरीष वरद भगवंत अन्न छत्रालय , राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालय , नाकोडा जैन सेवा मंडळ, कर्तव्य जनसेव फाउंडेशन, मातृभूमी प्रतिष्ठान, वर्धमान जैन श्रावक संघ, अण्णासाहेब पेठकर मित्रमंडळ, ओन्ली समाजसेवा ग्रुप, स्व. शोभाताई सोपल आणि स्व. शांतीलाल तातेड यांच्या स्मरणार्थ अन्नछत्रालय, महेश यादव आणि गणेश नान्नजकर मित्रमंडळ अन्नछत्र, सनराइज फाउंडेशन यांचा सन्मान केला.
---
फोटो : ०९ बार्शी हेल्थ
कोविड योद्धा म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब आंधळकर, बंडू माने