बार्शीकरांचे दातृत्व..दररोज पुरवले जातात २८०० जेवणाचे डबे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 01:21 PM2020-04-09T13:21:46+5:302020-04-09T13:23:44+5:30
कोरोनाच्या लढ्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या; वाटपात सुसूत्रता येण्यासाठी केला व्हॉट्सअप ग्रूप अन् केले जातंय नियोजन
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: कोराना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉक डाऊन’ केले आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक हातावरचे पोट असणारे नागरिक, स्थलांरितांच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे़त. त्यासाठी बार्शीत गल्या आठ दिवसांपासून शहरातील विविध सामाजिक संघटना पुढे आल्या असून शहरात दोन वेळेस मिळून सुमारे २८०० गजवंताना जेवणाचे डबे पोहोच केले जात आहेत़ वाटपात सूसूत्रता येण्यासाठी व्हॉटस्अप ग्रूप करुन नियोजन आखले जात आहे.
बार्शी शहर हे विस्ताराने मोठे असून, शहरातील स्लम एरिया, पारधी कँम्प, विविध हॉस्पिटल्स मधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, बाहेरगावाहून आलेले स्थलांतरित, निराधार, भिकारी तसेच ज्यांचे हातावर पोट आहे़ दररोज मजुरीने गेले तरच त्यांचे भागत आहे़ अशा लोकांचे लॉकडाऊनमुळे खाण्याचे वांदे झाले ोते़ त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, दानशूर उद्योजक पुढे आले आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने या काळात पुढे येऊन मदत करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला या संघटनांचे आपल्या पातळीवर वाटप सुरु होते़ मात्र या वाटपात सूसूुत्रता असावी यासाठी त्यांनी एक व्हाटस अप ग्रूप तयार करुन त्यामध्ये नियोजन केले जात आहे़ त्यासाठी भाऊसाहेब आंधळकर, अजित कुंकुलोळ, कमलेश मेहता, संतोष ठोंबरे, महेश यादव, मुरलीधर चव्हाण यांची यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.
या संघटना करताहेत अन्नाचे वाटप
- - नाकोडा जैन सेवा मंडळाच्या वतीने चपाती, भाजी, भात व शिरा असे ३५० पॅकेट एका वेळेस दिले जात आहेत़ यासाठी संजय धोका व सुभाष बदामिया नियोजन करतात़ आसिफ तांबोळी मित्र मंडळ व के़जी़एन ग्रुप च्या वतीने ही गेल्या सहा दिवसापासून दररोज २७५ जणांना भात व दाळ दिला जात आहे़ यासाठी बिलाल तांबोळी व आदम तांबोळी सेवा देता आहेत़ महेश यादव मित्र परिवार, गणेश रोड मंडळ व नृसिंह तरुण मंडळाच्या वतीने ही सोशल मिडीयावर आवाहन केले होते. त्यानुसार ते दररोज नोंदणी घेतात व त्यानुसार नूसार डबे पोहोच करतात़ त्यांचे ३०० डबे दिले जात आहेत़ महेश यादव व संतोष जाधवर, गणेश नान्नजकर यासाठी झटत आहेत़ यामध्ये चपाती ,भाजी व भात असा मेन्यू आहे़
- - मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने बारा महिने अन्नपुर्णा योजना राबवली जाते़ यामध्ये नियमित असणाºया १६५ जणांना दोन वेळेचे जेवण रिक्षाद्वारे घरपोच केले जाते़ तसेच हॉस्पिट"ामध्ये नाममात्र दरात दिले जात होते़ मात्र ‘लॉकडाऊनमुळे सध्या शंभर टक्के मोफत डबे दिले जात आहेत़ यात शहरातील विविध हॉस्पिटल व पोलिसांना दोन वेळेचे डबे देण्यात येत आहेत़ हा आकडा ६८० आहे़ यामध्ये चपाती, भाजी, वरण व भात हा मेन्यू असतो़
- - स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यावतीने सोमवार पेठेत इंदुमती आंधळकर यांच्या नावे अन्नछत्र चालवले जात आहे़ मात्र संचारबंदीमुळे लोक त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत़ त्यामुळे ते वाहनातून शहरातील विविध हॉस्पिटल्स, पारधी कँम्प, चारशे बावीस एरिया या भागात भात आणि सारची ७०० च्या जवळपास पाकिटे वाटप करीत आहेत़ यासाठी स्वत: भाऊसाहेब व रोनी सय्यद परिश्रम घेत आहेत़
- - चितांमणी प्रतिष्ठानकडून ही पारधी कॅम्प मधील नागरिकांसाठी ५०० मसाला भाताची पाकीट पोहोच केली जात आहेत़ त्यासाठी महेश देशमाने व उमेश थिटे झटत आहेत़ भगवंत मंदिरातील राजा अांऋषी अन्न छत्र ही गर्दी होत असल्यामुळे बंंद आहे़ त्यांच्याकडूनही शहरात रस्त्यावरील भिक्षेकरु, आश्रितांना २५० डबे पोहोच केले जात आहेत़ त्यासाठी बंडू माने व अभिमान भोसले सेवा देत आहेत़ दादा गायकवाड यांच्या देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने किराणा मालाच्या साहित्याचे कीट घरपोच दिले आहेत़ आतपर्यंत ६०० पाकिट त्यांनी वाटप केली आहेत़
- तर शहरातील दाळ कारखानदार दिलीप खटोड हे वैयक्तिक खर्चाने स्वत:च्या घरी तयार केलेला नाष्टा पोलिसांसाठी गेल्या दहा दिवसापासून देत आहेत़ तर दिवसभरात पोलिसांसाठी कोणी ना कोणी काहीतरी वाटप करीतच आहे़