सांस्कृतिक वैभव लयाला गेल्याची बार्शीकरांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:25+5:302020-12-07T04:16:25+5:30

२७ हजार स्क्वेअर फूट इतक्या अवाढव्य जागेत जुन्या काळातील चुन्याचे बांधकाम असलेली उदयची दिमाखदार वास्तू रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष ...

Barshikar's grief over the loss of cultural glory | सांस्कृतिक वैभव लयाला गेल्याची बार्शीकरांची खंत

सांस्कृतिक वैभव लयाला गेल्याची बार्शीकरांची खंत

Next

२७ हजार स्क्वेअर फूट इतक्या अवाढव्य जागेत जुन्या काळातील चुन्याचे बांधकाम असलेली उदयची दिमाखदार वास्तू रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घ्यायची. बाळकृष्ण गोविंद सुलाखे हे या थिएटरचे मालक. या थिएटरच्या प्रारंभापासूनच अत्याधुनिक डबल मशीनवर चित्रपट दाखविले गेले आणि अगदी थिएटर बंद होईपर्यंत हे वैशिष्ट्य कायम राहिले.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुपरस्टारची क्रेझ असणाऱ्या अनेक आघाडीच्या नायक-नाईकांची जुने आणि नवे चित्रपट उदय टॉकीजमध्ये तुफान चालले.

१९६० साली पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार यांच्या अभिनय आणि संवादाच्या जुगलबंदीने गाजलेल्या ‘मुगले आजम’ या चित्रपटाला बार्शीकरांनी पसंती दिली. हा चित्रपट दहा आठवडे चालला. सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्या भूमिका खूप लोकप्रिय झाल्या.

बाळकृष्ण सुलाखे यांनी आपल्या मुलाचे नाव उदय हे या थिएटरला दिले आणि या थिएटरवर ही पुत्रवत प्रेम केले; मात्र या व्यवसायात समोर येणाऱ्या अनेक अडचणींमुळे त्यांनी २००५ साली हे थिएटर बंद केले. वाढते वीज बिल, भरमसाठ करमणूक कर, मल्टिप्लेक्सचे अतिक्रमण, विविध माध्यमांमुळे घरातच खिळून राहिलेला प्रेक्षकवर्ग यामुळे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या घटतच गेली. परिणामी चित्रपटगृह चालवणे हा व्यवसाय आर्थिक नुकसानीचा झाला. त्यामुळे कितीही सांस्कृतिक प्रेम असलेलं आणि ग्लॅमरस व्यवसाय असला तरी थिएटर चालवणे अशक्यप्राय झाले. परिणामी २०१३ साली त्यांनी ही वास्तू विकली ते आता वेगवेगळ्या उद्योगात कार्यरत आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र शोचे आयोजन

उदय थिएटरने प्रेक्षकांच्या मागणीला नेहमीच महत्त्व दिले. काही चित्रपट हे कौटुंबिक कथानकामुळे महिला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तेव्हा फक्त महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र शोचे आयोजन केले होते. विशेषत: ‘हम आपके हे कौन’साठी महिलांची झुंबड उडाल्याचे महिला प्रेक्षक सांगतात.

कोट :::::::::

२०१३ साली सुलाखे यांच्याकडून हे चित्रपटगृह आम्ही बंद अवस्थेत विकत घेतले. भविष्यात मुंबई, पुणे, सोलापूरच्या धर्तीवर बार्शीमध्ये मल्टिप्लेक्स सुरू करण्याचा संकल्प आहे.

- अभिजित सोनिग्रा,

मालक

Web Title: Barshikar's grief over the loss of cultural glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.