लोकमतच्या रक्ताचं नातं मोहिमेत बार्शीकरांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल ४०३ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:27+5:302021-07-10T04:16:27+5:30

बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ...

Barshikar's spontaneous participation in Lokmat's blood relationship campaign, 403 people donated blood | लोकमतच्या रक्ताचं नातं मोहिमेत बार्शीकरांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल ४०३ जणांनी केले रक्तदान

लोकमतच्या रक्ताचं नातं मोहिमेत बार्शीकरांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल ४०३ जणांनी केले रक्तदान

Next

बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवाजी महाराज व बाबूजींच्या प्रतिमांचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, नगराध्यक्ष अ‍ॅड. आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, अशोक सावळे, बाबासाहेब मोरे, रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप गांधी, मॉर्निंग फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक विजय राऊत, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, मल्लिनाथ गाढवे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आ़ राजेेंद्र राऊत होते.

सूत्रसंचालन सचिन उकिरडे यांनी केले तर आभार विजय राऊत यांनी मानले. शिबिरातील रक्त संकलन करण्याचे काम भगवंत ब्लड बँकेने केले. त्यासाठी शशिकांत जगदाळे, संदीप बरडे व गणेश जगदाळे यांच्या टीमने धावपळ केली. शिबिरात रक्तदान केलेल्या युवा कार्यकर्त्यांनी सभापती रणवीर राऊत यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊन फोटो काढून घेतले. सोशल मीडियावर शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केल्याचे फोटो व्हायरल केल्याचे दिसून आले.

----

शिबिर संपेपर्यंत सभापती तळ ठोकून

सकाळी नऊ वाजता सुरु झालेले हे रक्तदान शिबिर रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु होते. दुपारी शिबिरात पावसाने थोडासा व्यत्यय आला. मात्र, पाऊस कमी होताच हलक्या पावसात भिजत कार्यकर्ते रक्तदानासाठी शिबिरात सहभागी झाले. शिबिर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत सभापती रणवीर राऊत व त्यांची टीम शिबिरस्थळी तळ ठोकून होती.

----

पिता-पुत्रांनी केलं रक्तदान

आ. राजेंद्र राऊत यांनी स्वत: या शिबिरात रक्तदान केले. त्यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत, गटशिक्षणाधिकारी साधना काकडे, नगरसेवक दीपक राऊत, अ‍ॅड. महेश जगताप, पाचू उघडे, रमाकांत सुर्वे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष पंडित मिरगणे, कविता संजय अंधारे, समाधान पाटील, मंदार कुलकर्णी, भगवंत ब्लड बँकेचे संदीप बरडे, मर्चंट असो.चे सचिव महेश करळे या मान्यवरांनी रक्तदान केले.

-----

बहीण भावंडांचे प्रथमच रक्तदान

महेश व साक्षी या बहीण भावंडांनी या शिबिरात पहिल्यांदाच तर वैष्णवी परदेशी या महिलेने ३१ व्या वेळेस रक्तदान केले. आजपर्यंत ५३ वेळा रक्तदान केलेले उपळाई ठोंगे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मुकुंद जगदाळे यांचा आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय या शिबिरात आडत व्यापारी प्रदीपकुमार कोटलवार यांनी ८४ व्या वेळा रक्तदान केले.

----

लोकमतने नेहमीच समाज हिताला प्राधान्य देण्याचे काम केले आहे़ केवळ बातमी न देता कोरोनाच्या या महामारीच्या काळात रक्तदान महायज्ञ आयोजित करुन सामाजिक बांधिलकीही जपली आहे. बार्शीकरांचे आणि लोकमतचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत लोकमतचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

----

बार्शीकर सामाजिक कार्यात अग्रेसर

मॉर्निंग सोशल फाउंडेशननेही वृक्ष लागवडीची चळवळ शहरात तयार केली आहे़ त्यांनी केवळ झाडे लावली नाहीत तर जोपासून देखील दाखवली आहेत़ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केवळ व्यापार न करता नेहमीच बार्शीत विधायक कामाला सढळ हाताने मदत केली असल्याचे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी यावेळी काढले. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी देखील संयोजकांचे कौतुक करत बार्शीकर सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे सांगितले.

----

यांनी घेतले परिश्रम

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, मर्चंट असोचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव महेश करळे, खजिनदार अनिल गायकवाड, संचालक दादा बगले, माजी अध्यक्ष दामोदर काळदाते, व्यापारी सचिन मडके, प्रवीण गायकवाड, दीपक शिंदे, भरतेश गांधी, तुकाराम माने,राहुल मुंढे, बाजार समितीचे संचालक चंद्रकांत मांजरे, मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राऊत, पिंटू नवगिरे, सचिन उकिरडे, अनिल कोरेकर, सतीश दळवे, बार्शी नगरपालिकेचे गटनेते दीपक राऊत, नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे, अ‍ॅड. राजश्री डमरे-तलवाड, डॉ. नितीन थोरबोले तसेच संदीप मिरगणे, शंतनू पवार, बापूसाहेब पाटील, नागेश मोहिते, अजित काटे, राहुल यादव, विकी देशमुख, शंकेश बोकर,नितीन ढावारे या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

----

फोटो मेल केले आहेत

Web Title: Barshikar's spontaneous participation in Lokmat's blood relationship campaign, 403 people donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.