बार्शीपुत्र मुकूंद झालटेंनी दाखवले शौर्य; काश्मीरात चार दहशतवाद्यांचा केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:01 PM2020-11-20T13:01:14+5:302020-11-20T13:02:37+5:30

सोलापूर लोकमत विशेष...

Barshiputra Mukund Zhalte showed bravery; Four terrorists killed in Kashmir | बार्शीपुत्र मुकूंद झालटेंनी दाखवले शौर्य; काश्मीरात चार दहशतवाद्यांचा केला खात्मा

बार्शीपुत्र मुकूंद झालटेंनी दाखवले शौर्य; काश्मीरात चार दहशतवाद्यांचा केला खात्मा

Next

 

बार्शी - जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये आज पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती. दहशतवादी एका ट्रकमधून शस्त्रसाठ्यांसह भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सैन्याच्या जवानांनी त्यांचा खात्मा केला. त्यामध्ये, बार्शीपुत्र सीआरपीएफ (क्रोबा बटालियन) जवान मुकूंद झालटे यांनीही शौर्य दाखवत कारवाई केली.

जम्मूचे जिल्हा पोलीस प्रमुख एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितले की, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास दहतवाद्यांनी नगरोटा परिसरातील बान टोलनाक्याजवळ सुरक्षा दलांवर गोळीबार केला. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपून बसले होते. या गाडीतूनच ते जम्मूमधून काश्मीरकडे भारतीय हद्दीत प्रवेश करत होते. याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळताच सैन्यातील जवानांनी दहतवाद्यांचा मागोवा घेत, त्यांची गाडी टोलनाक्याजवळ अडवली. त्यावेळी, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर, जवानांनी पोझिशन घेत, मोहिमेनुसार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. सैन्यांसोबत या मोहिमेत कार्यरत असलेल्या सीआरपीएफच्या मुकूंद झालटे यांनीही धाडसी कारवाईत आपलं योगदान दिलं. मुकूंद हे मूळ बार्शी तालुक्यातील पूरी गावचे सुपुत्र आहेत. मुकुंद यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

मुकूंद अंकुश झालटे असे या बार्शीपुत्राचे आणि देशाच्या शूरवीर जवानाचे नाव असून त्यांनी टेक्निकल हायस्कुलमध्ये आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सन 2011 साली CRPF च्या पहिल्याच टर्ममध्येच परिक्षा उतीर्ण करुन ते भरती झाले आहेत. सध्या, पॅरामिलेट्रीच्या कोब्रा बटालियनमध्ये ते देशसेवा करत आहेत. सध्या त्यांचे कुटुंब संभाजीनगर नवीन रेल्वे स्थानक रोड येथे राहत आहे.

Web Title: Barshiputra Mukund Zhalte showed bravery; Four terrorists killed in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.