बार्शीच्या मयूरने शोधून काढला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने दिले २२ लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:25 PM2021-06-17T12:25:41+5:302021-06-17T12:29:27+5:30
...अन् त्याने चमत्कार केला
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : फेसबुक - इन्स्टाग्रामने केलेले आव्हान स्वीकारत बार्शीच्या मयूर फरताडे या युवकाने प्रायव्हसी क्रॅक केली. बदल्यात कंपनीने त्याला २२ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला ३० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.
...अन् त्याने चमत्कार केला
भारतीय विकासक मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. २१ वर्षीय मयूर फरताडे याने सांगितले की, फेसबुकच्या प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममध्ये एक गंभीर बग आहे, ज्याचे हॅकरने सांगितले तर लोकांचे बरेच नुकसान होऊ शकते. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रहिवासी असलेला मयूर हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. तो शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे.
लॉकडाऊनमध्ये पुरेसा मोकळा वेळ होता. काहीतरी नवीन शिकायचे म्हणून वेगवेगळ्या स्विक्युरी रिसोर्सेचचे लिखाण वाचत होतो. त्यातूनच मला इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फिचर्स बघून वेब ॲप आणि अँड्रॉइड ॲपवर टेस्ट करीत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुकचा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसर्चेस पार्टीसिपेट करू शकतात. इथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला.
- मयूर फरताडे