बार्शीची अशीही दानत.. एकाच बैठकीत जमले ३५ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:36+5:302021-04-30T04:27:36+5:30
यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर ...
यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, सचिव भरतेश गांधी, माजी अध्यक्ष तुकाराम माने, सचिन मडके, प्रशांत पैकेकर, मंदार कुलकर्णी, हेमंत जाधव उपस्थित होते.
बाजार समितीच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरचे कामही सुरू झाले आहे. बार्शीत तालुक्यासह सुमारे १३ तालुक्यांतील ५५० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात कित्येक कुटुंबच्या कुटुंब पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांची जेवणाची गैरसोय होत आहे. त्यांची सोय व्हावी म्हणून केवळ माणुसकी या नात्याने व्यापाऱ्यांपुढे स्वतः पाच लाख रुपये देत हा प्रस्ताव ठेवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्याच बैठकीत सुमारे ३५ लाख रुपये निधी जमा झाला आहे. यात आणखी १० ते १५ लाखांची वाढ होऊ शकते.
१ मे पासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांची यादी मागवून त्यांना जागेवर जेवण पोहोच केले जाणार आहे. सोबत पाण्याची बाटली ही दिली जाणार आहे.
डॉक्टरांनी माणुसकी जपावी
डॉक्टर हे समाजातील देव आहेत. रुग्णांसह सर्वांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. हा सर्वांसाठी अडचणीचा काळ आहे. डॉक्टरही जोखीम घेऊन काम करीत आहेत. तरीही बार्शीतील काही हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी अव्वाच्या सव्वा बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे माझी डॉक्टरांना विनंती आहे की माणुसकी जपत व सामाजिक भान जपत योग्य बिल आकारावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
ग्रामीण पोलिसांच्या कोविड रुग्णालयास पाच लाखांची मदत
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्यावतीने पंढरपूर येथे उभारलेल्या कोविड रुग्णालयात अनुषंगिक साहित्य खरेदी करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावतीने अडीच लाख आणि बार्शी मर्चंट असोसिएशन यांच्यावतीने अडीच लाख असे एकूण पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश नगरसेवक विजय राऊत, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
फोटो
२९बार्शी-बैठक
ओळी
बार्शी येथे आयोजित बैठकीत कोविड रुग्णांना नाश्ता, जेवणासाठी निधी आमदारांकडे सुपुर्द करताना व्यापारी.