रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी बार्शीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:20+5:302020-12-11T04:49:20+5:30
आम्ही भारताचे लोक या जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष देशपांडे, आकाश दळवी, विजय वाघमारे व अक्षय आरगडे यांनी उपोषण सुरू ...
आम्ही भारताचे लोक या जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष देशपांडे, आकाश दळवी, विजय वाघमारे व अक्षय आरगडे यांनी उपोषण सुरू केले. शहरातील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. भुयारी गटारीचे काम अर्धवट आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामांमध्ये असलेल्या अनियमिततेची चौकशी करावी, पॅच रिपेअर करताना अगोदर रस्ते झालेले आहेत याची चौकशी करावी. खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातातील जखमींच्या उपचारांचा खर्च पालिकेने करावा. अपघातात अपंगत्व आलेल्यांना तीन लाखांची मदत करावी. भुयारी गटारीच्या कामाची चौकशी करून ते काम तत्काळ पूर्ण करावे. धुळीमुळे मानवाच्या श्वसनावर परिणाम होत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मानसिक, आर्थिक ताण नागरिकांवर येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो
१०बार्शी आंदोलन
फोटो ओळी
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन करताना मनीष देशपांडे, आकाश दळवी, विजय वाघमारे व अक्षय आरगडे.