बार्शीत नगरदैवत श्री भगवंत जयंती सलग दुसऱ्या वर्षीही साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:58+5:302021-05-25T04:24:58+5:30
सोमवार, दि. २३ रोजी पहाटेच्या वेळी एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एकाच दिवशी आल्याने रविवारी मंदिर समितीचे विश्वस्त नाना सुरवसे ...
सोमवार, दि. २३ रोजी पहाटेच्या वेळी एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एकाच दिवशी आल्याने रविवारी मंदिर समितीचे विश्वस्त नाना सुरवसे व त्यांच्या पत्नी अनिता सुरवसे यांच्या हस्ते श्री भगवंताची महापूजा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सरपंच दादा बुडूख, मुकुंद कुलकर्णी, मिठूभाऊ सोमाणी आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्ताने होणारे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यामुळे भगवंत महोत्सव रद्द झाल्याने तालुकावासीय सांस्कृतिक मेजवानीला मुकले.
---
सकाळी ६ वाजता गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पुजारी मनोज बडवे आणि अश्विनी बडवे यांच्याकडे पूजेचा मान होता. त्यानी मंदिराच्या गाभाऱ्यात पहिल्यांदाच आकर्षक फुलांची सजावट केली होती. देवाला संपूर्ण दागिने घातले होते, तर दुपारी सुशांत बडवे, सुशील बडवे व संदीप बडवे यांनी उन्हाळ्यामुळे चंदन उटी पूजा बांधली होती.
----
फोटो बार्शी १, बार्शी २, बार्शी ३