बार्शीत रुग्ण नातेवाईक आधार केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:50+5:302021-05-05T04:35:50+5:30
यावेळी भाजप नेते राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, अरुण कापसे उपस्थित होते. ...
यावेळी भाजप नेते राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, अरुण कापसे उपस्थित होते. सोपल म्हणाले, एचआरसीटी स्कोअर जास्त असला तरी रेमडेसिविर सोडून इतरही औषधे आहेत. त्याचा वापर करावा. रुग्ण व डॉक्टरपेक्षा नातेवाईक त्या इंजेक्शनसाठी आग्रह करत आहेत. पांगरी, बार्शी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड व्यवस्था करावी. त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा आहेत, मात्र ते कार्यान्वित नाहीत. वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणीही रुग्णांची सोय व्हावी, अशी जिल्हाधिकारी आणि आरोग्य प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी सांगितले. भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, आणीबाणीची परिस्थिती आहे. नियंत्रण करणे गरजेचे. रेणुका मंगल कार्यालयात नातेवाईकांना राहण्याची सोय करत आहोत. त्याठिकाणांहून नातेवाईकांनी रुग्णांना जेवणाची सोय करण्यात येईल. मध्यवर्ती माहिती सेंटर (कंट्रोल रूम) सुरू करण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.