सोलापुरात पाच हजाराची लाच घेताना बठाणचे तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

By Appasaheb.patil | Published: July 17, 2023 04:48 PM2023-07-17T16:48:42+5:302023-07-17T16:49:38+5:30

पाच हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

Bathan's Talathi and Gram Panchayat employees caught in 'ACB's net' while taking bribe of Rs 5,000 in Solapur | सोलापुरात पाच हजाराची लाच घेताना बठाणचे तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

सोलापुरात पाच हजाराची लाच घेताना बठाणचे तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

googlenewsNext

सोलापूर : भिमा नदीतून काढलेल्या बेकायदेशीर वाळूची कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. श्रीमंत मसाजी भालेराव (वय ५० वर्ष पद बठाण ग्रामपंचायत कर्मचारी, रा. मु.पो. बठाण, मंगळवेढा, जि. सोलापूर) व गजानन शंकरराव चाफेकर (वय-३२ वर्षे, पद तलाठी सज्जा मुडबी तसेच अतिरिक्त कार्यभार सजा बठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, मूळ रा. मु.पो. उमरबटी, ता. मुखेड, जि. नांदेड. सध्या रा. बाजार समितीच्या पाठीमागे राजु पाटील यांचे घरी भाड्याने मंगळवेढा, जि. सोलापूर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम चालू असून, बांधकामासाठी वाळु कमी पडल्याने, तक्रारदार यांनी त्यांचे गावाजवळुन मौजे बठाण हदीतून जाणाऱ्या नदीतून वाळू काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारी नुसार केलेल्या पडताळणीमध्ये यातील आलोसे यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करून, ते स्विकारण्याचे मान्य केले.

त्यामुळे आज सोमवार १७ जुलै २०२३ रोजी सापळा कारवाईमध्ये यातील आलोसे क्र. ०१ यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आलोसे क्रं. ०१ व ०२ यांना ताब्यात घेण्यात आले असुन, मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, संतोष नरोटे, गजानन किणगी, राहुल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Web Title: Bathan's Talathi and Gram Panchayat employees caught in 'ACB's net' while taking bribe of Rs 5,000 in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.