संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारीत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:53+5:302021-06-03T04:16:53+5:30
कुर्डूवाडी : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहायला हवे. ज्यांना बाल रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड सेंटरची मान्यता हवी आहे, ...
कुर्डूवाडी : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहायला हवे. ज्यांना बाल रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड सेंटरची मान्यता हवी आहे, त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवावेत. जेणेकरून धावपळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत केल्या.
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी जोती कदम होत्या. यावेळी प्रथम माढा तालुक्यातील कोरोना सद्य:स्थितीबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी माहिती दिली. त्यानंतर तालुक्यातून आलेल्या बालरोगतज्ज्ञांनी आपापली भूमिका मांडली.
या बैठकीत माढा व कुर्डूवाडी येथील शासकीय वसतिगृह हे भविष्यातील बाधित होणाऱ्या बालरुग्णांसाठी कोविड केअर सेंटर म्हणून आरक्षित ठेवण्याचे ठरले. तालुक्यात ज्या बालरोगतज्ज्ञांचे सध्या डेडिकेटेड हॉस्पिटल आहे, त्यांनी त्यांच्या सेंटरमध्ये बाधित बालरुग्ण उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वांना सूचना दिल्या.
बैठकीस तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, नायब तहसीलदार रवींद्र कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र बोबडे, डॉ. विनोद शहा, डॉ. अमोल शिंदे, डॉ. अमोल माने, डॉ. सोमनाथ गायकवाड, डॉ. सदानंद व्हनकळस, डॉ. अल्पेश दोशी आदींसह माढा तालुक्यातील १७ बालरुग्णतज्ज्ञ उपस्थित होते.
----
०२ कुर्डूवाडी-बैठक
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात माढा तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी जोती कदम, यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांच्यासह इतर डॉक्टर.
----