इंग्रजी शाळांच्या मागण्यांसाठी मेस्टातर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:37+5:302021-07-30T04:23:37+5:30

आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांची शासनाकडील थकीत प्रतिपूर्ती रक्कम त्वरित मिळावी, पालकांकडे असणारी थकीत चालू वर्षाची फी जमा करण्याबाबत शासन स्तरावरून ...

The bear movement by Mesta for the demands of English schools | इंग्रजी शाळांच्या मागण्यांसाठी मेस्टातर्फे धरणे आंदोलन

इंग्रजी शाळांच्या मागण्यांसाठी मेस्टातर्फे धरणे आंदोलन

Next

आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांची शासनाकडील थकीत प्रतिपूर्ती रक्कम त्वरित मिळावी, पालकांकडे असणारी थकीत चालू वर्षाची फी जमा करण्याबाबत शासन स्तरावरून पत्र निर्गमित करावे, नवीन वर्गाचा प्रवेश करतेवेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अथवा नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावे, विनादाखला प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय रद्द करावा, आरटीई पंचवीस टक्केअंतर्गत शिक्षण नर्सरी ते बारावीपर्यंत करावे, रिक्त जागा शाळा स्तरावर भरण्याची परवानगी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हरीष शिंदे, प्रदेश सचिव गणेश निळ, प. महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, मार्गदर्शक अमोल सुरवसे, जिल्हा सचिव विनोद कदम यांनी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना दिले. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सूचनेनुसार लोकसभा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत इंगळे, राष्ट्रवादीतर्फे माढा तालुकाध्यक्ष रणजीत चंदनकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी सल्लागार कृष्णदेव मदने, हेमंत बरडे, संजय मोहिते, विनोद कदम, नितीन भोगे, शरद अनंतकवळस, सुनील झाडे, डॉ. सुधाकर कांबळे, बंडू गडदे, ज्योतिबा चव्हाण, गणेश बुरकुटे, शिवाजी लाडे, नितीन डोंगरे, हनुमंत चव्हाण, गणपत मोरे, जयंत दळवी आदी उपस्थित होते.

Web Title: The bear movement by Mesta for the demands of English schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.