पैशाच्या कारणावरून गाडीत घालून मारहाण; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:07+5:302021-05-29T04:18:07+5:30
जखमी विशाल धनांजी कांदे (३० रा. बोरगाव खु.ता.बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिसात २७ रोजी तक्रार देताच अण्णासाहेब अशोक काजळे ...
जखमी विशाल धनांजी कांदे (३० रा. बोरगाव खु.ता.बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिसात २७ रोजी तक्रार देताच अण्णासाहेब अशोक काजळे रा. आरणगाव ता.बार्शी व यांच्या टिपरचा चालक व इतर एकजण अशा तिघाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की २६ रोजी खांडवी येथे टिप्परला नवीन टायर टाकण्यासाठी जखमी व गणेश उकिरडे थांबले होते. त्यावेळी याचा टिप्पर बघून फॉरचून गाडीतून आलेले काजळे व त्यांचे साथीदार थांबले व काजळे यांनी जखमीस माझे पैसे दे असे म्हणून शिवीगाळ केली व गाडीत बळजबरीने बसविले व वडशीगे गावाजवळ येताच लोखंडी रॉडनी मारहाण केली व जखमीस रात्रीच्यावेळी टेभुर्णी गावातील चौकात सोडून गेले. जखमी अवस्थेत असताना गावाकडून गाडी मागवली येथे आल्यानंतर तालुका पोलीसात तक्रार दिली याचा तपास पोसई प्रवीण जाधव करत आहेत.
----