जमिनीच्या कारणावरून पिता-पूत्रासह पुतण्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:03+5:302021-07-18T04:17:03+5:30

महूद येथील समाधान शिवाजी मोरे यांच्या पवारवाडी येथील गट नं. २४५ मधील पडीक जमिनीमध्ये गावातील मोहन दशरथ पवार व ...

Beating nephew with father-son over land | जमिनीच्या कारणावरून पिता-पूत्रासह पुतण्याला मारहाण

जमिनीच्या कारणावरून पिता-पूत्रासह पुतण्याला मारहाण

Next

महूद येथील समाधान शिवाजी मोरे यांच्या पवारवाडी येथील गट नं. २४५ मधील पडीक जमिनीमध्ये गावातील मोहन दशरथ पवार व अभिमान निवृत्ती पवार या दोघांनी अतिक्रमण करून लोखंडी चॅनल रोवल्याने त्यांनी अभिमान पवार यास तुम्ही येथे लोखंडी चॅनल का रोवले, म्हणून विचारले. त्याने ही जागा आमची असल्याने रोवल्याचे सांगितले.

शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास समाधान मोरे, वडील शिवाजी मोरे, त्याचा पुतण्या सत्यवान मोरे हे घरासमोर असताना मोहन पवार, ब्रह्मदेव पवार, अभिमान पवार, समाधान पवार, शुभम पवार, प्रशांत पवार, रोहित पवार, नानासाहेब पवार, विक्रम पवार, अजित पवार, ऋतुराज पवार, प्रसाद पवार (सर्व रा. पवारवाडी) यांच्यासह इतर १० अनोळखी इसम आले. त्यांच्यापैकी शुभम पवार याच्या हातात लोखंडी चॅनल होते. तर मोहन पवार यांच्या हातात लाकडी काठी होती. सर्व लोक आम्हाला ही जागा आमची असून तुमचे येथे काही नाही, असे म्हणू लागले.

त्यावेळी समाधान मोरे यांनी ही जागा आमची आहे असे म्हणाला असता शुभम पवार याने समाधान यास तुला बघतोच, असे म्हणून लोखंडी चॅनलने पाठीत मारहाण केली. त्यावेळी मोहन पवार यांनी काठीने माझ्या उजव्या पायावर मारहाण केली. तर त्याच काठीने वडील शिवाजी मोरे यांच्या उजव्या बरगडीवर मारहाण केली. त्यावेळी पुतण्या सत्यवान मोरे यास शुभम पवार यांनी कमरेत लाथेने मारहाण केली. तर इतर लोकांनी आम्हाला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परत या ठिकाणी आलात तर जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मोहन पवार यांनी समाधान याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याशेजारील बोटातील ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व शुभम पवार यांनी गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची चेन काढून घेतली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत समाधान शिवाजी मोरे, रा. पवारवाडी याने १० ते १२ लोकांसह इतर १० अनोळखी इसमांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Beating nephew with father-son over land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.