झाडाच्या मुळ्या शेतात आल्याने मारहाण; पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:01+5:302021-05-05T04:37:01+5:30
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र शिंदे यांनी सुमारे १३ वर्षांपूर्वी गावातील भगवान मधुकर मोरे व मारुती मधुकर मोरे यांना ...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र शिंदे यांनी सुमारे १३ वर्षांपूर्वी गावातील भगवान मधुकर मोरे व मारुती मधुकर मोरे यांना आपल्या हिश्यातील ५ एकर १ गुंठा जमीन विकली होती तरीही ते फिर्यादीच्या शेतजमिनीत अतिक्रमण करून वहिवाटीस अडथळा निर्माण करून उरलेली शेतजमीन आम्हाला विकून जा, असा दबाव टाकत आहेत. १ मे रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या गावातील आप्पा महादेव फरड हे फिर्यादीच्या घरी येऊन म्हणाला, माझ्याकडून भगवान मारुती मोरे यांचे शेत नांगरताना तुझ्या बांधावरील बाभळीचे झाड पडले. ते पाहण्यासाठी फिर्यादी गेला असता तिथे भगवान मधुकर मोरे, मारुती मधुकर मोरे, मधुकर भानुदास मोरे, सुशीला मोरे व ताई मोरे हे हातात काठ्या व दगड घेऊन आले. आणि तुझ्या बाभळीच्या मुळ्या तुझ्या शेतात ठेवायच्या आमच्या शेतात कशाला घेऊन यायच्या, असे म्हणत जातिवाचक शब्द वापरून शिवीगाळ करून मारहाण केली. यावरून संबंधित पाच जणांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे करत आहेत.