पाच लाखासाठी पत्नीला हातपाय बांधून मारहाण; पतीसह पाच जणांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Published: August 4, 2023 03:06 PM2023-08-04T15:06:25+5:302023-08-04T15:06:43+5:30

फिर्यादी खतीजा यांचे बिलाल याच्याशी विवाह झाला होता.

Beating wife by tying hands and feet for five lakhs; Crime against five persons including husband | पाच लाखासाठी पत्नीला हातपाय बांधून मारहाण; पतीसह पाच जणांवर गुन्हा

पाच लाखासाठी पत्नीला हातपाय बांधून मारहाण; पतीसह पाच जणांवर गुन्हा

googlenewsNext

सोलापूर : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीला दोरीने हातपाय बांधून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत खतीजा बिलाल दंडोती ( वय २१, रा. साईनाथ नगर २ ) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी खतीजा यांचे बिलाल याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मला व्यवसाय करण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये म्हणत त्यांना मारहाण करत होते. शिवाय इतर आरोपी हे पीडितेला मानसिक छळ करत होते. घरातील सगळी कामे फिर्यादीकडून करवून घेत व जेवण न देता उपाशी ठेवून त्यांना त्रास देत होते. अशा आशयाची फिर्याद खतीजा यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून पती बिलाल दंडोती, सासू शमा दंडोती, अय्युब शेख, सना मोसिन शेख, नणंद जहरा अस्लम शेख ( सर्व रा. शोभादेवी नगर, नई जिंदगी) यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास बहिर्जे करत आहेत.

Web Title: Beating wife by tying hands and feet for five lakhs; Crime against five persons including husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.