शेतीच्या वादातून मारहाण; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल, डोंगरगावातील येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 08:27 AM2021-06-30T08:27:43+5:302021-06-30T08:28:14+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मंगळवेढा : मागील भांडणाचा व शेतीच्या वादाचा राग मनात धरून सखुबाई दादा चौगुले तीची मुलगी धनश्री व सासू रुक्मिणी या तीन महिलांना सळईने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कामाबाई शिवाजी बुरुंगले, राणी दत्तात्रय चौगुले, शिवाजी बुरुंगले, नवनाथ बुरुंगले, दत्ता चौगुले (रा.डोंगरगाव), पिंटू चौगुले, जयश्री पिंटू चौगुले (खुपसंगी) या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी सखुबाई दादा चौगुले (वय 30) ही दि. 29 रोजी सकाळी 9.00 वा. डोंगरगाव येथील हेंबाडे वस्तीजवळ असलेल्या शेतात जनावरासाठी चारा काढत असताना वरील आरोपींनी मागील भांडणाचा तसेच शेतहद्दीच्या वादाचा राग मनात धरून सळईने व दगडाने फिर्यादीस मारहाण केली. तसेच फिर्यादीची सासू रुक्मिणी व मुलगी धनश्री हि भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याने डोकीस जखम झाली आहे.
या मारहाणीत सासूचे केस धरून खाली पाडल्याने तीचे डावे कान पकडून जोरात ओढून तोडल्याने तीला गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक सुहास देशमुख हे करीत आहेत.