ग्रामीण भागात बेडची सोय आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:49+5:302021-04-19T04:19:49+5:30
उत्तर तालुक्यातील कौठाळी, कळमण, वडाळा, गावडीदारफळ, नान्नज, गुळवंची, बीबीदारफळ या गावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इतरही गावात ...
उत्तर तालुक्यातील कौठाळी, कळमण, वडाळा, गावडीदारफळ, नान्नज, गुळवंची, बीबीदारफळ या गावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इतरही गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. या रुग्णांना त्रास वाढला तर उपचारासाठी सोलापूरशिवाय पर्याय नाही. परंतु सध्या सोलापूरमध्येही रुग्णांसाठी बेड मिळत नाहीत. शासकीय व खासगी दवाखान्यात शोधाशोध करून बेड उपलब्ध करून घ्यावे लागत आहेत. शोधूनही सहज बेड मिळेलच असे नाही.
कौठाळी, कळमणच्या रुग्णांना ३०-३५ किलोमीटर अंतर कापून सोलापूरला जावे लागते. वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन वडाळा, नान्नज व मार्डी परिसरात बेड उपलब्ध करून उपचाराची सुविधा मिळणे गरजेचे आहे.
ग्रामीण रुग्णालयच आजारी
वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयातील डाॅ. मायादेवी शेळके, डाॅ. विकास माने हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याच रुग्णालयाचे डाॅ. अविनाश घोरपडे हे पत्नी डाॅ. जयश्री घोरपडे या कोरोना बाधित असल्याने होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे बालरोग तज्ज्ञ डाॅ. सूरज साठे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचा भार आहे.
कोट ::::::::
गुळवंचीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना येथील उपकेंद्राचे डाॅ. बेंद्रे यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागात वर्ग करण्यात आले आहे. गावात घरोघर रुग्ण वाढत आहेत. एका घरातील तर सर्वच सहा लोक पाॅझिटिव्ह आले आहेत. येथील डाॅ. बेंद्रे यांना गुळवंची येथे सेवा देण्यास बोलवावे.
- संजय पौळ,
तालुका उपप्रमुख, शिवसेना