दारूसाठी पैसे दे म्हणत भिकाºयावर केला चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:42 PM2020-06-04T16:42:13+5:302020-06-04T16:44:57+5:30

सिद्धेश्वर प्रशाला जवळील घटना; एकास अटक; फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Beggars attacked with knives for money for alcohol; Incident in Solapur | दारूसाठी पैसे दे म्हणत भिकाºयावर केला चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना

दारूसाठी पैसे दे म्हणत भिकाºयावर केला चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना

Next
ठळक मुद्देजखमी झालेल्या भिकाºयाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेयाप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी अरुण गायकवाड यांनी फिर्याद दिलीपैसे देत नसल्याचे पाहून अझरुद्दीन विजापुरे याने जवळ असलेला चाकु बाहेर काढला

सोलापूर: दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत एका अनोळखी भिकाºयावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. चाकूने वार करणाºयास अटक झाली असून याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अझरुद्दीन तोफिक विजापूरे (वय २८ रा. रहिमतबी टेकडी सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. महात्मा गांधी खादी महामंडळाच्या इमारतीसमोर असलेल्या फुटपाथवर भिकारी बसला होता. अझरुद्दिन विजापूरे हा तेथे आला त्याने अनोळखी भिकारी (वय ४२) याच्याकडे दारूसाठी पैसे दे असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.

भिकाºयाने माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणत होता. पैसे देत नसल्याचे पाहून अझरुद्दीन विजापुरे याने जवळ असलेला चाकु बाहेर काढला. चाकूने भिकाºयाच्या अंगावर वार केला. तुला जिवंत सोडणार नाही खल्लास करतो असे म्हणतात भिकाºयाच्या पोटात चाकू मारला. भिकारी गंभीर जखमी होऊन जमिनीवर विव्हळत पडला होता. याची माहिती फौजदार चावडी पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बालाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वाय. एन. बर्डे हे घटनास्थळी गेले. जखमी झालेल्या भिकाºयाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अझरुद्दीन विजापुरे याला अटक केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी अरुण गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

Web Title: Beggars attacked with knives for money for alcohol; Incident in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.